Sanction of funds for farms : शाश्वत सिंचनाची सोय राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सुरवातीला ही योजना राज्यात ठराविक ठिकाणी होती आता ती संपूर्ण राज्यभर सुरु करण्यात आली आहे.
सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरित गृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकांकरिता मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत अनुदान वितरीत करण्यात येते.
कृषि आयुक्तालयाकडून प्राप्त मागणी व सद्यःस्थितीत असलेल्या प्रलंबित दायित्वाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरीता ₹५२९.५० लक्ष निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सन २०२४-२५ मधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेच्या ₹४०० कोटीच्या (सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी ₹३०० कोटी + वैयक्तिक शेततळे घटकासाठी ₹१०० कोटी) कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सन २०२४-२५ या वर्षात वैयक्तिक शेततळे या घटकाकरीता ₹५२९.५० लक्ष (रुपये पाच कोटी एकोणतीस लाख पन्नास हजार मात्र) निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येत आहेत.
महा-डीबीटी प्रणालीद्वारे या योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान अदागयीची कार्यवाही करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी.
कोणत्या जिल्ह्यात किती शेततळे आणि किती निधी मिळणार पाहण्यासाठी https://gr.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करा व पान क्रमांक ५ आणि ६ पहा.