बरेच शेतकरी शेतीबरोबर जोडधंदा म्हणून गाई म्हशी पाळतात त्यातून त्यांना चार पैसे देखील भेटतात, पण आज आपण एका अशा गावाबद्दल बोलणार आहोत जो संपूर्ण गाव मुरघास निर्मिती व दुग्ध व्यवसाय मध्ये महाराष्ट्र समोर एक आदर्श ठरलेलं आहे.
आपण बोलत आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी गावाबद्दल. या गावाची संपूर्ण लोकसंख्या 1600 च्या आसपास आहे. संपूर्ण गाव डोंगरांनी व्यापलेला असून गावामध्ये प्रजन्यमान कमी असल्यामुळे टँकरने आठ ते दहा महिने पाणीपुरवठा करावा लागतो.
त्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गावकऱ्यांना नेहमीच सतावत असतो. पण तेंव्हा अशा परिस्थितीमध्ये गावांमधील 700 ते 800 नागरीकांनी एकत्र येऊन सलग 50 दिवस श्रमदान करून लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केली, केलेल्या कामाचे फळ म्हणून गावाला जलसंधारणाच्या कामाबद्दल कोरेगाव तालुक्यातील या गावाला प्रथम क्रमांक मिळाला. तसेच भारत फोर्स या कंपनीने गाव दत्तक घेऊन मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कामे या गावांमध्ये केली.
गावातील युवकांनी चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुरघास तंत्रज्ञान वापरण्यास सुरवात केली, तसेच खरीप मध्ये झालेला चांगला पाऊस आणि जलसंधारणाची झालेली कामे यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला, बरेच तरुणांनी शहरातील नोकरीला रामराम करून दुग्ध व्यवसायामध्ये आपले करिअर बनवले, ह्या व्यवसायातून सध्या हे गाव महाराष्ट्रात इतर गावांसाठी मुरघास आणि दुग्ध व्यवसाय एक आदर्श गाव म्हणून समोर आले आहे.