
Cotton market prices : जून २०२५ मध्ये कापसाचे बाजारभाव स्थिरतेच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर उत्पादनात थोडी घट झाली असली तरी भारतासारख्या प्रमुख उत्पादक देशात उत्पादन तुलनेने स्थिर राहिल्याचे पाहायला मिळते. कापूस हे व्यावसायिक पीक असल्यामुळे याच्या किमतीवर जागतिक बाजारातील हालचालींचा मोठा प्रभाव असतो.
USDA च्या माहितीनुसार, २०२४-२५ मध्ये भारतात कापसाचे उत्पादन अंदाजे ३१५.९ लाख गाठी इतके राहण्याची शक्यता आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत थोडे कमी आहे. मात्र, देशांतर्गत साठा आणि मागणी समतोल असल्याने किमती स्थिर राहण्याचा अंदाज आहे. जागतिक उत्पादनात देखील काहीशी घट असून, त्यामुळे मोठी घसरण होण्याची शक्यता नाही.
मागील तीन वर्षांत जून महिन्याच्या सरासरी किमती ७००० ते १११०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिल्या आहेत. यंदाही जूनमध्ये बाजारभाव सुमारे ७५०० ते ८००० रुपये दरम्यान राहू शकतात. किमान आधारभूत किंमत (MSP) ६२२० रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आली आहे.
राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात या प्रमुख उत्पादक राज्यांमधून पुरवठा होत असून, स्थानिक बाजारपेठांत सध्या स्थिरता जाणवते. वस्त्रोद्योगातील मागणी थोडीशी संथ असली तरी सणासुदीच्या कालावधीत त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च व साठवणुकीचा विचार करून विक्रीचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन बाजार तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.