नमस्कार शेतकरी मित्रांनो krishi24.com मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी नवनवीन योजनांची किंवा इतर शासन महत्त्वाचे जीआर असतील. याच्याबद्दल माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. याविषयी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारलं जाणारा प्रश्न म्हणजे गाय गोठा ची योजना सुरू आहे का ? यासाठी अर्ज कसा केला जातो, याचा अर्जाचा नमुना मिळेल का? याच्यासाठीच्या अटी शर्ती काय असेल. त्याच्यासाठी वृक्ष लागवड करावी लागते का? याच्यासाठी कागदपत्रे काय लागतात. याच पार्श्वभूमीवरती आपण या लेखांमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
फेब्रुवारी 2021 च्या जीआर नुसार ज्यामध्ये शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार ती योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे.याच योजनेच्या अंतर्गत गाई गोठा असेल ,शेळीपालन कुक्कुटपालन शेड असेल या तिन्ही वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या जातात या योजनेचा या योजनेचा लाभ देत असताना आपण पाहिले की 60: 40 मेंटेन करणे खूप अवघड होते.
गाई गोठ्यांमध्ये कुशल व अकुशल मध्ये 8:92 चा रेशो आहे. हा रेशो जर मेंटेन करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वैयक्तिक जे वृक्ष लागवड असेल बांधावरील वृक्ष लागवड असेल , रस्त्याच्या दुतर्फावरील वृक्ष लागवड असेल किंवा सार्वजनिक कामावरील शंभर दिवसांची मजुरी असेल अशा प्रकारची कंपल्सरी कामेही करावी लागतात.तसेच अशीच काम केली तरच हा 60 :40 चा रेशो मेंटेन करून ते लाभार्थी पात्र होतात.
याच्यामध्येच आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा बाय परगेशन करण्यात आले असून गाय गोठा मध्ये छत विरहित गाय गोठा छता सहित गाय गोठा याच्यामध्ये देखील याच्यासाठीच्या काही अटी वेगळ्या आहेत.याच्यासाठी जे लागणारी कागदपत्रांचा नमुना आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. अर्ज मध्ये काही अटी देण्यात आलेल्या आहे लाभार्थीच्या पात्रतेबद्दलची माहिती देण्यात आली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना . गाय गोठा छतासह, छतावरहित कुक्कुटपालन शेड शेळीपालन शेड वैयक्तिक कामासाठी अर्ज चा नमुना याच्यामध्ये आपण पाहू शकता, सुरुवातीला काही अटी देण्यात आलेल्या आहेत . ज्याच्यामध्ये जनावरांचा गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे ,कुकूटपालन शेड बांधणे यापैकी एक काम एका लाभार्थ्यासाठी मंजूर करून प्रत्येक लाभार्थी पातळीवर मनरेगाच्या अंतर्गत 1) वैयक्तिक क्षेत्रावर वृक्ष लागवड व संगोपन, (तीन वर्ष एक हेक्टर) ( कोणतेही वृक्ष किंवा विविध वृक्षांची मिश्रण ) दोन 2) वैयक्तिक शेततळे 15 बाय 15 बाय 15 मीटर ची लाभ घेतलेले लाभार्थी यानंतर 3) सार्वजनिक क्षेत्रावर व रस्ता वृक्ष लागवड संगोपन कामे किमान 200 झाडांचा एक गट संगोपन करणारे कुटुंब 4) कंपोस्ट बर्डींगचे लाभ घेतलेले लाभार्थी तसेच योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मनरेगा अंतर्गत 275 वैयक्तिक व सार्वजनिक कामापैकी ज्या कामांमध्ये कुशल खर्चाचे प्रमाण जास्त आहे. अशा सर्व कामाच्या संयोजनातून 60 : 40 चा अकुशल कुशल प्रमाण राखण्याचा प्रयत्न करणारे सर्व कुटुंब लाभार्थी मंजूर हे लाभ घेण्यास पात्र राहतील.
वरील प्रमाणे जे लाभार्थी योजनेच्या अंतर्गत कामाच्या संयोजनातून कुशल, अकुशल प्रमाण 60: 40 राखण्याचा प्रयत्न करणारे असे सर्व इच्छुक कुटुंबास अर्जदाराची योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र राहतील. सदर पात्र अर्जदार यांनी खालील एकच कामासाठी एकच अर्ज करणे आवश्यक आहे.
यामध्ये तुम्ही पाहू शकता की जनावरांचा गोठा बांधणे, छतावरहित यामध्ये छतासह साधारणपणे 77 हजार पर्यंत अनुदान दिले जाते. शताविरहित 48000 पर्यंत अनुदान दिले जाते. यामध्ये लाभार्थ्याकडे गाई म्हशींची संख्या किती आहे? त्याची संख्या, यामध्ये छतासह अर्ज करायचा आहे यामध्ये शेळी मेंढीची संख्या, कुक्कुटपालन शेड बांधणे यामध्ये पक्षाची संख्या ,ज्या बाबींमध्ये आपण अर्ज करणार आहे. या बाबींमध्ये टिक करणे आवश्यक आहे.
यामध्ये लाभार्थ्याची पात्रता व कागदपत्रे देखील आपण पाहू शकता.
सदर लाभार्थ्याची पात्रता खालील प्रवर्गातील असणे आवश्यक आहे, असे असल्यास बरोबरची खूण करणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती ,भटक्या विमुक्त जमाती, दारिद्र्यरेषेखालील इतर कुटुंब महिला प्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रदान असलेली कुटुंब, सुधारक योजनेची लाभार्थी, इंदिरा आवास योजनेची लाभार्थी, अनुसूचित जमातीचे, वन्यपरंपरागत वन, निवासी वन अधिकारी मान्यता अधिनियम 2006 नुसार पात्र, व्यक्ती कृषी कर्जमाफी 2008 नुसार अल्पभूधारक, एक हेक्टर पेक्षा जास्त पण दोन हेक्टर पाच हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी जमीन मालक कुळ व सीमांत शेतकरी एक हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकरी ,मनरेगा अंतर्गत अनुज्ञ असलेल्या विविध वैयक्तिक उदाहरणार्थ कामाचा प्रकार फळबाग वृक्ष लागवड शेततळे व सार्वजनिक उदाहरणार्थ कामाचे प्रकार ,प्रस्ताव पाझर तलाव गाळ काढणे, ग्रामपंचायत क्षेत्रावर वृक्ष लागवड संगोपन इत्यादी कामाच्या संयोजनातून कुशल व कुशल प्रमाण 60 : 40 ला भरती पातळीवर राखण्यासाठी योजनेने अंतर्गत काम केलेले असावी ,याबाबत ग्रामसेवक कृषी सहाय्यक यंत्रणा अधिकारी यांच्या कामाबाबतचा शिफारस दाखला जोडावा.
सदर लाभार्थी कुटुंब यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक क्षेत्रावर किमान 20 ते 50 फुलझाडे वृक्ष लागवड करण्यात येऊन त्याचे तीन वर्ष संगोपन करून झाडे शंभर टक्के जिवंत ठेवून योजनेचा लाभ पूर्ण घेणारे लाभार्थी किंवा चालू वर्ष मध्ये ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान शंभर दिवस काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
1) वैयक्तिक क्षेत्रावर वीस ते पन्नास फळझाडे वृक्ष लागवड केल्यास गाय गोठा छताविरहित कामाचा लाभार्थी करता पात्र असेल.
2) वैयक्तिक क्षेत्रावर 50 पेक्षा जास्त फळझाडे वृक्ष लागवड केल्यास गाय गोठा छतासह शेळी पालन शेड कुक्कुटपालन कामाचा लाभार्थ्यांकरिता पात्र असेल.
3) सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान 100 दिवस काम केलेले असावे .चार पशुपालन असल्याबाबतचा पशुधन प्रवेक्षक पशुधन अधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे गाय गोठाकरिता दोन ते चार गुरे आवश्यक आहे जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील शेळीपालन शेड करिता दोन ते दहा शेळी आवश्यक आहे .
4) कुक्कुटपालन शेडकरिता किमान 100 पक्षी आवश्यक आहे. (ज्याला अर्ज भरते वेळेस शंभर पक्षी नाही त्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जामीनदारासह शेडची मागणी करणे व शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत कुक्कुटपालन शेडमध्ये 100 पक्षी पाळण्यासाठी आणणे बंधनकारक राहील.)
5) कुटुंबाचे मनरेगा ओळखपत्र ऑनलाइन जॉब कार्ड किंवा जॉब कार्ड झेरॉक्स पत्र आवश्यक आहे.
6)लाभार्थ्याच्या नावे जमीन जागा असणे आवश्यक आहे असल्यास सोबत सातबारा आठ अ ग्रामपंचायत नमुना 9 चा उतारा तीन महिने आतील साक्षंकित सत्यप्रत जोडावी.
7) लाभार्थी सदर गावाचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
8) लाभार्थी आधार कार्ड झेरॉक्स प्रत.
9) लाभार्थीचे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुक झेरॉक्स प्रत.
निवडलेल्या कामाचा जागेचा अंश रेखांश असलेला फोटोसह ग्रामसेवक तांत्रिक सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक लाभार्थी यांची संयुक्त स्थळ पाहणी अहवाल जोडणे आवश्यक आहे.
मी घोषित करतो करते की मी या योजने अंतर्गत नोंदणीकृत मंजूर असूनही कुटुंबासह प्रस्तावित कामावर अंकुशल मजूर म्हणून काम करण्यास तयार आहे. तसेच मी वर नमूद केलेल्या माहिती व कागदपत्रे तसेच माहितीप्रमाणे बरोबर आहे. सदर योजनेचा गैर उपयोग केल्यास किंवा वर नमूद केलेल्या तपशील खोटा निघाल्यास राज्य व केंद्रशासनाने ठरवलेली वसुली करून घेण्यास माझी पूर्ण समिती आहे.
अर्जदाराची सही किंवा अंगठा त्यानंतर सदर लाभार्थीचे काम मंजूर झाल्यास योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे फोटो काम सुरू करण्यापूर्वी चा फोटो काम चालू असतानाचा फोटो काम पूर्ण झाल्याचा बोर्ड व लाभार्थी सह फोटो इत्यादी हे तीन प्रकारांमधील फोटो अंतिम ध्येय प्रस्ताव सोबत सात दिवसात सादर करणे बंधनकारक राहील.
याचबरोबर यामध्ये तांत्रिक मंजुरीसाठी अर्ज करावा लागणार आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडे जो या अर्जाच्या प्रस्तावासोबत जोडावा लागणार आहे. यामध्ये सुद्धा लाभार्थ्याचे नाव निवडलेल्या कामाचे नाव ,सदर लाभार्थी आणि योजने अंतर्गत सार्वजनिक व वैयक्तिक कामाच्या संयोजनातून 60 :40 चे प्रमाण करिता केलेल्या कामाची माहिती आणि प्राधान्यक्रम अशा प्रकारची माहिती याच्यामध्ये भरावी लागणार आहे.
ग्रामसेवकाच्या व सरपंचाच्या माध्यमातून तांत्रिक मान्यतेचे पत्र या ठिकाणी दिले जाणार आहे . यानंतर तपासणी सूची यामध्ये कागदपत्र कोण कोणती जोडलेले आहेत. लाभार्थी यामध्ये कोण कोणत्या बाबींसाठी पात्र आहे हे ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सही च्या माध्यमातून जोडले जाणार आहे. यानंतर एकदा आपला दिला जाणार आहे. लाभार्थ्याने या ठिकाणी वृक्ष लागवड फळबाग लागवड शेततळे बांधबंधिस इत्यादी काम केलेले आहेत. याबाबत ग्रामसेवकाच्या माध्यमातून एक पत्र दिले जाईल हे शिफारस पत्र सुद्धा अर्ज सोबत जोडावे लागणार आहे. सार्वजनिक केलेले कामाचा दाखला सुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे.
पशुपालनाचा दाखला पशुसंवर्धन जे वैद्यकीय अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून दिला जाईल . त्याच्यामध्ये त्यामध्ये टॅगिंग क्रमांक जनावरांची संख्या लहान जनावर किती आहेत. मोठी जनावर किती आहेत. ही सगळी माहिती त्या अर्जावर भरायची आहे. हा दाखला देखील अर्जासोबत जोडावा लागणार आहे,
त्यामध्ये गेल्या जीआर नुसार काही बदल करण्यात आलेले आहे. तसेच या अर्जासोबत रहिवाशी स्वयंघोषणापत्र भरून या अर्ज सोबत जोडावे लागणार आहे.
अशा प्रकारचा प्रस्ताव आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये सादर करायचा आहे. बरेच शेतकऱ्यांचा गाय गोठा योजनेकडे कल असतो . परंतु जो काही 60 चा रेशो आहे मेंटेन करण्यासाठी जी काही आवश्यक कामे आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे . जर अशा प्रकारची कामे केली तरच जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या ठिकाणी गाय गोठा अनुदानासाठी लाभ मिळेल.