गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर किमान ३० रुपये देणाऱ्यांनाच प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यावर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे ठाम आहेत. बुधवारी मंत्रालयात गाय दूध अनुदानाबाबत राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांचे प्रतिनिधी व शेतकरी संघटनांची बैठक झाली.
बैठकीत राज्यातील खासगी दूध संघांनी ३० ऐवजी २८ रुपये ५० पैशांपर्यंत अट शिथिल करण्याची मागणी केली होती . ५ रुपये अनुदान पाहिजे असेल तर दूध उत्पादकांना ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. साठी किमान तीस रुपये दर देणे सक्तीचे आहे.
मात्र, दूध संघांच्या प्रतिनिधींनी दूध संघांना ते परवडत नसल्याचे समोर आणून दिले परंतु , ते मान्य न करत उत्पादकांना प्रतिलिटर ३० रुपये दिलेच पाहिजेत, यावर दुग्ध विकास मंत्री विखे-पाटील ठाम राहिले. जे ३० रुपये दर देणार नाहीत , त्यांना अनुदान मिळणार नाही.असे विखे-पाटील म्हणाले
संघ प्रतिनिधींनी सांगितले की ,दुधाला दर नसल्यामुळे अतिरिक्त दुधाची पावडर केली जाते, प्रतिलिटर दीड रुपये रूपांतरण खर्च देता येईल का याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, अशी ग्वाही मंत्री विखे-पाटील यांनी दिली.केवळ तीन महिन्यांसाठी दूध अनुदान योजना न राबवता पुढे सुरू ठेवण्याची मागणी केली आहे .
शेतकरी संघटनेच्या वतीने गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे अभिनंदन
गाय दुधासाठी किमान दराबाबतचा राज्य शासनाने अध्यादेश काढत ‘गोकुळ’ने कार्यक्षेत्राबाहेरील दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल बैठकीमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे अभिनंदन करण्यात आले .
अनुदानासाठी दुग्ध विभागाला दिल्या सूचना
जे दूध उत्पादक अनुदानापासून वंचित राहिलेले आहे अश्या दूध उत्पादकांची जिल्हानिहाय आकडेवारी मंत्री विखे-पाटील यांनी वाचून दाखवत हे अनुदान सर्व दूध उत्पादकांना मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दुग्धविकास विभागास दिले. मागील अनुदानापासून कोल्हापूर जिल्ह्यातील साडेसहा हजार दूध उत्पादक वंचित राहिलेले आहेत.