आयटीमध्ये मोठया पगाराची नोकरी सोडून एक दाम्पत्य आपल्या गावी परतले, व स्वतःची दहा एकर शेती करू लागले. स्वतःच्या दहा एकर शेतीमध्ये दुसरे कोणतेही पीक न घेता शेवग्याची लागवड केली दोन ओळींमध्ये नऊ फुट अंतर ठेवून रोपे लावली . पहिल्यांदाच शेवग्याच्या शेंगांचा व्यवसाय त्यांनी सुरू केला होता . परंतु पाहिजे तेवढा त्यांना फायदा झाला नाही. त्यातूनही त्यांनी मार्ग काढला व त्यांनी शेवग्याच्या पाल्यापासून पावडर तयार करायचे ठरवले व नंतर त्यांनी पावडर तयार करण्यास सुरुवात केली व ती पावडर मोरिंग्या पावडर म्हणून ओळखली जाऊ लागली . मधुमेह या आजारासाठी ही पावडर खूप गुणकारी असते या पावडरची किंमत एक हजार रुपये किलो इतकी आहे.
या शेवग्याच्या पावडरच्या व्यवसायातून या दाम्पत्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहे. हा व्यवसाय कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारा आहे तसेच हा व्यवसाय ही दोघेही खूप चांगल्या प्रकारे संभाळत आहेत . या पावडरला मुंबई ,पुणे इतर जिल्ह्यांमध्येही खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे डॉक्टर व व्यवसायिक सुद्धा ही पावडर खरेदी करतात.
शेवग्याच्या पानांपासून व्यवसाय
नांदेड जिल्ह्यामधील उच्चशिक्षित दाम्पत्यांनी लाखो रुपयांची नोकरी सोडून शेवग्याच्या पाल्यापासून पावडर करण्याचा एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायामधून मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे हे दोघे महिन्याखेरीस लाखों रूपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. गुलाब पावडे व मंजुषा पावडे या दाम्पत्याचे नाव आहे.
आयटी कंपनीचे तीन लाखाचे पॅकेज सोडून आले गावात.
मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे हे नांदेड जिल्ह्याच्या शेजारी असलेले पावडेवाडी या गावातील राहणारे आहेत . हे दाम्पत्य आयटी कंपनीमध्ये काम करत होते. या दोघांनी पुणे, हैदराबाद यासारख्या शहरामधील मोठ्या कंपनीमध्ये पंधरा वर्ष नोकरी केली. मंजुषा पावडे यांना महिन्याला एक लाख वीस हजार तर त्यांचे पती गुलाब पावडे यांना दोन लाख इतके पॅकेज मिळत होते.
शेवग्याच्या पानांत विविध गुणधर्म.
शेतीतून वेगळा काहीतरी व्यवसाय करून दाखवायचा हे त्यांच स्वप्न होतं त्यामुळे ते शहरात असतानाच ते कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळेल असा कोणता व्यवसाय शेतीतूनकरता येईल याची ते माहिती काढत होते. त्यावेळी त्यांना शेवग्याच्या शेतीची माहिती मिळाली . व त्यांनी शेवग्याच्या शेतीची आणखीन माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच त्यांना शेवग्याच्या शेंगा आणि त्यांच्या पाल्याचे काय काय गुणधर्म असतात याची माहिती मिळाली व शेवग्याच्या शेतीतून किती उत्पन्न मिळेल याचीही त्यांनी माहिती घेतली. आता ते दाम्पत्य शेवग्याच्या पाल्यापासून पावडर करण्याचा एक वेगळ्या प्रकारच्या व्यवसायतून लाखोंची कमाई करत आहेत .