Shakti cyclone : महाराष्ट्रावर शक्ती चक्रीवादळच नवं संकट ,काय परिणाम करणार ? तीव्रता किती जाणून घ्या सविस्तर ..

Shakti cyclone : शक्ती सायक्लोन बद्दल गेले चार ते पाच दिवसां आधी तुम्ही ऐकलं असेल की या चक्रीवादळाच सावट सध्या देशावर आहे . पण एका नवीन चक्रीवादळाची आता चर्चा होतीय हळूहळू हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, इकडे सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर सध्या तरी कर्नाटकच्या किनारपट्टी जवळ कर्नाटकच्या किनारपट्टी भागात अरबी समुद्रामध्ये एका चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ,आणि हळूहळू हे चक्रीवादळ वरच्या बाजूला जाऊ शकतं. महाराष्ट्राच्या जवळ येऊ शकतं महाराष्ट्र असेल मुंबई असेल त्याचबरोबर त्यानंतर गुजरातच्या सुद्धा भागाला या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.

म्हणजेच मोठ्या प्रमाणात पाऊस येऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये कशाप्रकारे अख्ख्या भारतावर किंवा अख्या महाराष्ट्राच्या जवळ हे चक्रीवादळ जे आहे त्याची निर्मिती होऊ शकते आणि ते महाराष्ट्राच्या जवळ जाऊ शकतं .अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचा चा पट्टा तयार झालेला आहे एक कमी दाबाचा क्षेत्र तयार झालेला आहे. आता कमी दाबाच क्षेत्र जेव्हा तयार होतं तेव्हा त्या बाजूला जोरदार वारे व्हायला लागतात चक्राकार वारे व्हायला लागतात आणि हे वारे जेव्हा तीव्र होतात तेव्हा त्याचं त्यानंतर चक्रीवादळात रूपांतर होतं चक्रीवादळात रूपांतर झाल्यामुळे जोरदार वारे वाहतात जोरदार पाऊस पडतो आणि फक्त पाऊस पडतो नाही, पण ढगांच्या कडकतेने. सोसाट्याच्या वाऱ्यासह येतो त्याच्यामुळे नुकसान सुद्धा होऊ शकतं . ४८ तासांत उद्या असाल तर, बघितलं उद्या कुठल्या बाजूला किंवा कुठल्या दिशेला ही जाईल आणि हळूहळू तो आता महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत आहे. जर तुम्ही बघितलं तर 19 तारखेची ही सगळी परिस्थिती आहे म्हणजेच आजच्या दिवसानंतर म्हणजेच 48 तासांनंतर ही सगळी परिस्थिती. 19 तारखेला आता पुढे जर आपण गेलो 72 तासानंतर काय परिस्थिती असू शकते हे जर तुम्ही बघितलं तर आणखीन याची तीव्रता वाढत आहे आणखीन हे महाराष्ट्राच्या जवळ येत आहे हा इकडे महाराष्ट्राचा भाग आहे आणि यामुळे मुंबई असेल किंवा मुंबईच्या आजूबाजूचा परिसर असेल अखख्या महाराष्ट्रातील जे सगळे जिल्हे आहेत किंवा हा सगळा किनारपट्टीचा जो सगळा परिसर आहे. या ठिकाणी जोरदार पाऊस बरसू शकतो असा अंदाज आहे याची तीव्रता आणखीन वाढत चाललेली आहे आणि आपण अजून बघितलं 21 तारखेला कशा प्रकारची परिस्थिती असू शकते ,आणखीन हे तीव्र झालेल आहे इकडे तुम्हाला दिसेल चक्री वादळामध्ये याचं हळूहळू रूपांतर होऊ शकतो अर्थात हे फक्त प्रेडिक्शन आहे हे फक्त एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुढे जे काही आयएमडी प्रेडिक्शन देईल किंवा जे काही जीएफएस मॉडेल पुन्हा एकदा रिलीज करेल त्यानंतर आपल्याला हे कन्फर्म होईल की कशा अशी परिस्थिती असेल, पण सध्या तरी १९ ते 23 तारखेवर खास करून आपल्याला नजर ठेवायची आहे.

कारण या वेळेला अरबी समुद्रामध्ये कर्नाटकच्या सीमेलगत एक चक्रीवादळ तयार होऊ शकतं असा अंदाज आहे आणि हळूहळू हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या जवळ येण्याची आता इथेही एक शक्यता आहे जर आपण पाहिलं तर इथे बघा, आता हा २१ म्हणजे २२ तारखेची ही सिचुएशन आहे 22 तारखेची सगळी परिस्थिती आहे . 22 तारखेला कशा प्रकारे परिस्थिती असू शकते आता याची तीव्रता आणखीन वाढत जाणार आहे , हळूहळू हे गुजरातकडे म्हणजेच उत्तरेकडे असलेले हे कमी दाबाचे क्षेत्र ती हालचाल करू शकते, असाही अंदाज आहे. पुढे जर आपण बघितलं तर हळूहळू मग त्याची जी तीव्रता आहे ती कमी होईल त्याचा जो दाब आहे तो हळूहळू ओसरू शकतो त्याची तीव्रता जी आहे ती हळूहळू ओसरू शकते असा सुद्धा इथे एकूणच जर आपण बघितला तर अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, म्हणजेच 19 तारखेपासून जर आपण बघितलं तर 23 ते 25 तारखेपर्यंत हे कमी दाबाच क्षेत्र जे आहे महाराष्ट्राजवळ त्याचा परिणाम होऊ शकतो. किनारपट्टीच्या भागामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे मुंबई असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल यामुळे जोरदार या सगळ्या भागांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस येऊ शकतो वारे वाहू शकतात असा सुद्धा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . आता हवामान तज्ञ होसाळीकर यांनी या संदर्भात ट्वीट केलेल आहे आणि त्यांनी काय म्हटलेल आहे ते सुद्धा पहा 22 मे च्या सुमारास कर्नाटक किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता त्यामुळे 19 ते 25 मे मध्ये राज्यात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कोकण असेल त्याचबरोबर कोकण घाटात तुरळक ठिकाणी मुसळदार अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. 17 ते 20 दरम्यान कोकण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाडा या भागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघ गर्जना त्याचबरोबर विजा वादळी वारे आणि हलका मध्यम पाऊस असणार आहे म्हणजेच गेले दोन ते तीन दिवस झाले मध्य महाराष्ट्र असेल कोकण असेल महाराष्ट्राचा ओव्हरऑल सगळा भाग असेल या भागांमध्ये पाऊस पडतच आहे.

अवकाळी पावसाचा सावट महाराष्ट्रावर आहे, पण पाहिलं तर 22 तारखेला म्हणजेच 19 ते 25 तारखे दरम्यान जी काही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होणार आहे जी काही चकरी वादळाची त्यामुळं ही परिस्थिती निर्माण होणार आहे महाराष्ट्रातील अनेक भागांना धोका निर्माण होऊ शकतो असा सुद्धा एकूणच अंदाज व्यक्त करण्यात येतोय अर्थातच या सगळ्या जे काही हे हवामानाचे अपडेट्स असतील याची यांच्यावर आपली नजर असणारच आहे पण हे जे प्रेडिक्शन आहे हे हवामान विभागाने व्यक्त केलं होतं हा अंदाज व्यक्त केलेला होता हे जीएफएस मॉडेल जे आहे ते रिलीज करण्यात आलेलं होतं हवामान विभागाकडून या चक्रीवादळामुळे किंवा या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अजून त्याला चक्रीवादळ असं म्हणता येणार नाहीये कारण अजून तरी म्हणजे सध्याची परिस्थिती पाहिली तर बघितली तर सध्या तरी ते आपल्या महाराष्ट्रावर त्याच सावट नाहीये किंवा ते महाराष्ट्राच्या जवळ नाहीये ते कर्नाटकच्या सीमेलगत आहे पण असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय की हळूहळू ते महाराष्ट्राजवळ येऊ शकतं मुंबई जवळ येऊ शकतं आणि ते वरच्या दिशेला जाऊ शकत आणि त्यानंतर त्याचा जोर ओसरू शकतो त्याच्यामुळे हवामान विभागाने पुढच्या चार ते पाच दिवसांनंतर तयार होणाऱ्या या सगळ्या कमी दाबाच्या क्षेत्राची ही माहिती ती देण्यात आली आणि ते म्हणाले की नवीन चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं.

आमच्या सगळ्यांवर नजर असणारच आहे पण तुम्हाला या यासंदर्भात इतर काही प्रश्न असतील तर आपण टिप्पणी विभागात विचारू शकता तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारच वातावरण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये कळवा या चक्रीवादळा संदर्भात तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शन मध्ये मांडा तसेच हवामान अहवाल आणि इतर हवामान अहवालही आहेत. व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर कृषी . २४ कॉम ला भेट द्यायला विसरू नका धन्यवाद ..