उत्तरेकडील राज्यात बटाट्याच्या लागवडीत घट, यंदा कसे राहतील दर जाणून घ्या सविस्तर

बटाट्याची लागवड प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यात केली जाते यंदा मात्र हे चित्र बदललेले आहे तिथे बटाट्याची लागवड सुमारे 20 टक्क्यांनी घटली असून भविष्यातील तुटवडा लक्षात घेऊन त्या भागात बटाट्या साठवणूक करण्यास सुरुवात झाली आहे.

या परिस्थितीचा परिणाम बटाट्याच्या दरावर झाला असून आठवडाभरात बटाट्याच्या भावात घाऊक बाजारामध्ये दहा रुपयांनी वाढ झाली असून यंदा वर्षभर बटाट्याचे भाव चढेच राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बटाट्याची सर्वाधिक लागवड उत्तर प्रदेश येथे होते त्या खालोखाल पंजाब, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश या राज्यातही बटाट्याचे पीक घेतले जाते.  उत्तरेकडील राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बटाट्याची आवक होते.

बटाट्याचा हंगाम सप्टेंबर महिन्यात सुरू होतो चार ते पाच महिने नवीन बटाट्याचा हंगाम सुरू राहतो यंदा उत्तर प्रदेशात बटाट्याची लागवडीत 20 टक्क्यांनी घट झाली आहे.

नवीन बटाट्याचा हंगाम जवळपास संपला असून सध्या बाजारात बटाट्याची आवक कमी प्रमाणावर होत असल्याची माहिती मार्केट यार्ड तील बटाटा व्यापारी राजेंद्र तथा आप्पा कोरपे यांनी दिली.

उत्तर प्रदेशासह मध्य प्रदेश पंजाब गुजरात पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांनी बटाट्याची साठवणूक सुरुवात केली आहे हंगाम संपल्यानंतर वर्षभरासाठी लागणारे बटाट्याची साठवणूक शीतगृहात केली जाते. सध्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बटाट्याचे साठवणूक सुरू केली आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा शहरांमध्ये बटाट्याची मोठी बाजारपेठ असून गेल्या आठवड्यापासून बटाट्याची आवक कमी प्रमाणावर होत आहे घाऊक बाजार मध्ये एक किलो बटाट्याला प्रतिवादीनुसार 23 ते 26 रुपये भाव मिळत आहेत तर 35 ते 40 रुपये भावाने किरकोळ बाजारामध्ये विक्री होत आहे.

स्थानिक भागामध्ये बटाट्याची उत्पन्न होते मात्र त्यातून संपूर्ण राज्याची भागत नाही त्यामुळे उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या बटाट्यावर आपल्याला अवलंबून राहावे लागते तिथेच यंदा कमी लागवड झाली आहे त्यामुळे यावर्षी बटाटीचे भाऊ वर्षभर चढेच राहतील असे राजेंद्र कोरपे बटाटा व्यापारी मार्केट यार्ड यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *