घाटपुरीतील शेतकऱ्याचे ड्रॅगनफ्रुटच्या शेतीने फुलवले नशीब , अवघ्या एकरात मिळवले १५ लाखांचे उत्पन्न…

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत, बहुउपयोगी शेतीकडे वळले आहे . मसाला पिकांसोबतच, चियासीड चे उत्पन्न घेऊ लागले आहे तसेच आता शेतकरी परदेशी फळांचीही शेती करू लागले आहे .

घाटपुरीतील एक युवा शेतकऱ्यांने देखील आधुनिक शेतीप्रयोगाची कास धरत या प्रवाहामध्ये ड्रॅगनफ्रुटची शेती केली आहे . प्रदीप राजाराम वानखडे यांच्या याच कमी कालावधीत भरघोस उत्पन्न देणारे ‘ड्रॅगनफ्रुट’ शेतीची आता यशोगाथा झाली आहे.

ड्रॅगनफ्रूट शेतीवर व्हिएतनाम या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून असल्याचे पाहून आपणही अशी शेती करण्याचा संकल्प करावा . इंटरनेट, यू-ट्यूबवर काही यशोगाथा पाहून घाटपुरी शिवारामध्ये अडीच एकरावर त्यांनी लागवड केली.

१५ लाखांचे भरघोस उत्पादन..

लागवड केल्या नंतर सुरुवातीला धाकधूक होती परंतु युवा शेतकरी प्रदीपचे गुलाबी स्वप्नं दुसऱ्यावर्षी पूर्ण झाले. दुसऱ्या वर्षातमध्ये लागवड खर्च भरून निघाला. त्यामुळे खामगाव तालुक्यामध्ये ते आता ड्रॅगनफुटच्या शेतीसाठी प्रसिद्ध ठरले आहेत . आता त्याची यशोगाथा तालुक्यातील युवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे.

ड्रॅगन फ्रुटची लागवड ..

ड्रॅगन फ्रुटची लागवड इतर फळांप्रमाणेच भारतात खूप वेगाने लोकप्रिय झाली आहे . या फळाची किंमत 200 ते 250 रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. याची लागवड केली तर चांगले उत्पन्न मिळेल. यातून तुम्ही भरघोस कमाई करू शकता. ज्या ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात पडतो, त्या ठिकाणी सुद्धा हे फळ चांगले वाढते. ड्रॅगन फ्रुटचा वापर आईस्क्रीम, जेली, जॅम, फळांचा रस, वाइन इत्यादींमध्ये केला जातो. फेस पॅक मध्ये देखील वापरले जाते. त्यामुळे त्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे.

ड्रॅगन फ्रुटची लागवड केल्यानंतर एका हंगामामध्ये किमान ३ वेळा फळ येते.साधारणपणे 400 ग्रॅम पर्यंत एका फळाचे वजन असते. किमान 50-60 फळे एका झाडाला येतात. या रोपाची लागवड झाल्या नंतर पहिल्या वर्षापासूनच ड्रॅगन फ्रुटची फळे येण्यास सुरुवात होते. याला मे-जून महिन्यामध्ये फुले येतात, आणि डिसेंबर महिन्यामध्ये फळे येतात. साधारणपणे दोन ड्रॅगन फ्रुट रोपांमधील २ मीटर अंतर ठेवावे . जर तुमच्याकडे एक हेक्टर जमीन असेल, तर तेथेही तुम्ही सहजपणे लागवड करू शकता.

सुरुवातीच्या काळात तुम्ही लाकडी किंवा लोखंडी काठीचा आधार झाडांना देऊ शकता . ही झाडे 50 सेमी x 50 सेमी x 50 सेमी आकाराच्या खड्ड्यात लावावीत , ज्यामुळे त्यांची चांगली वाढ होईल. या फळांपासून चांगले उत्पन्न मिळते ,अनेक तरुण नोकरी सोडून ड्रॅगन फ्रुटची शेती करतात .एक एकर शेतीतून दरवर्षी आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतात .

परंतु , या लागवडी साठी सर्वात अगोदर चार-पाच लाख रुपये खर्च करावे लागतील.या फळांच्या लागवडीला पाण्याची कमी गरज असते त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्यावर जास्त खर्च करावा लागत नाही, तसेच जमिनीचा दर्जा फारसा चांगला नसला तरी या फळाची चांगली वाढ होते . याच्या लागवडीसाठी जास्त सूर्यप्रकाश लागत नाही. त्यामुळे शेडचा वापर करणे गरजेचा आहे, ज्यामुळे फळांची चांगली लागवड करता येईल. जर तुम्ही तुमच्या शेतात ड्रॅगन फ्रुटची लागवड करण्याचा विचार करत असाल तर वालुकामय चिकन मातीसोबत जास्त सेंद्रिय कर्ब असलेली जमीन या पिकास जास्त फायदेशीर ठरते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *