Cotton purchase : सीसीआयच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांचा कापूस खासगी बाजारात वळला; जाणून घ्या सध्या कसा मिळतोय दर…

Cotton purchase : सीसीआयच्या जाचक गुणवत्ता निकषांमुळे आणि कापसाच्या रकमेचा विलंबाने होणारा भरणा यामुळे अनेक शेतकरी शासकीय खरेदीऐवजी खासगी व्यापाऱ्यांकडे वळताना दिसत आहेत. शासनाने प्रतिक्विंटल ८१०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला असला, तरी तीन आठवड्यांपर्यंत रक्कम खात्यावर जमा न होणे आणि कडक अटींमुळे शेतकऱ्यांची अडचण वाढत आहे. परिणामी, टाकळीभानसारख्या ठिकाणी कापूस संकलनाचे केंद्र तयार झाले असून स्थानिक व बाहेरील व्यापारी रोखीने सुमारे ७१०० रुपयांचा दर देत मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. हमीभावापेक्षा कमी दर असूनही तात्काळ रोख मिळत असल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना प्राधान्य देत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येते.

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/01/2026
अमरावतीक्विंटल75780080507925
सावनेरक्विंटल3000780078007800
भद्रावतीक्विंटल250740081007750
समुद्रपूरक्विंटल1283760082007900
जालनाहायब्रीडक्विंटल348793080027970
घाटंजीएल. आर.ए – मध्यम स्टेपलक्विंटल1800775083208000
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल61770081008000
उमरेडलोकलक्विंटल900790080608000
देउळगाव राजालोकलक्विंटल1500780080607950
किल्ले धारुरलोकलक्विंटल594792979567929
काटोललोकलक्विंटल88750080007850
मांढळलोकलक्विंटल920790079607930
भिवापूरलांब स्टेपलक्विंटल655775080757915
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल2010811082908150
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल5000770082808000
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल350770082007950
वरोरा-शेगावमध्यम स्टेपलक्विंटल137771081007800
किल्ले धारुरमध्यम स्टेपलक्विंटल185792980107939