Onion rate : आज राज्यातील कांदा बाजारात आवक कमी झाल्याने काही ठिकाणी दर वाढले, तर काही बाजारात भाव घसरले.

Onion rate : आज राज्यातील कांद्याच्या बाजारपेठेचा अहवाल पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, २५ डिसेंबर रोजी एकूण ७१,०६४ क्विंटल कांद्याची आवक झाली, ज्यात ९,१५१ क्विंटल चिंचवड, ३९,३०९ क्विंटल लाल, ३,६११ क्विंटल लोकल, ११,३७१ क्विंटल पोळ, आणि २,६३३ क्विंटल उन्हाळ कांदा होता.

लाल कांद्याची सर्वाधिक आवक सोलापूर आणि लासलगाव-विंचुर बाजारात नोंदवली गेली. यावेळी सोलापूरमध्ये दर किमान १०० रुपये आणि सरासरी १,००० रुपये/क्विंटल, लासलगाव-विंचुरमध्ये १,८०० रुपये, कळवणमध्ये १,४०० रुपये, पिंपळगाव (ब)-सायखेडा येथे १,१५१ रुपये, येवला येथे १,७५० रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला.

उन्हाळ कांद्याची जास्त आवक नाशिक जिल्ह्यातून झाली. येवला येथे सरासरी दर १,०६५ रुपये, कळवण येथे १,२०० रुपये, पिंपळगाव बसवंत येथे १,५०० रुपये, भुसावळ (जि. जळगाव) येथे ८०० रुपये/क्विंटल होता.

पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत येथे १,७५० रुपये, लोकल वाणाच्या कांद्याला सांगली-फळे भाजीपाला बाजारात किमान ५०० रुपये आणि सरासरी १,४०० रुपये, पुणे-पिंपरी येथे १,४०० रुपये, पुणे-मोशी येथे १,१५० रुपये, मंगळवेढा येथे ९०० रुपये, तर चिंचवड कांद्याला जुन्नर-ओतूर येथे २,००० रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/12/2025
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल12731100027001850
खेड-चाकणक्विंटल200100018001400
पुणे- खडकीलोकलक्विंटल277001200950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8140020001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल5634001500950
वाईलोकलक्विंटल20150025002000
कामठीलोकलक्विंटल21207025702350