इथेनॉल निर्मितीवरील बंधनांचा फेरविचार करा, साखर उद्योगांची मागणी वाचा सविस्तर ….

केंद्र सरकारने बी हेवी मोलॅसीस, उसाचा रस आणि सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर लावलेल्या प्रतिबंधाच्या निर्णयावर फेरविचार करावा अशी मागणी साखर उद्योगाने केली आहे . अनेक संघटना यासाठी केंद्रीय पातळीवर या मागणीसाठी जोर लावत आहेत.

हिवाळ्यात महाराष्ट्र व कर्नाटकात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे ऊसाची वाढ अन अपेक्षित रित्या चांगली झाली, याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या उत्पादन वाढीवर होत आहे . यामुळे केंद्राला साखर उत्पादन घटीची जी भीती वाटत होती ती आता दूर होत असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे.

साउथ इंडियन शुगर मिल्क असोसिएशन (कर्नाटक) ने अन्न मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांना पत्र लिहून सरकारने इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस आणि बी हेवी मोलिसिसचा वापर प्रतिबंधक करण्याच्या आदेशावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.

डिसेंबर च्या सुरुवातीला अन्न मंत्रालयाने साखर कारखान्यांना इथेनॉल तयार करण्यासाठी उसाचा रस आणि सिरप न वापरण्याचे निर्देश दिले होते . साखर उद्योगातून टीका झाल्यानंतर सरकारने एक पाऊल मागे घेत सतरा लाख टना पासून साखर तयार करण्यास परवानगी दिली होती . हंगामाच्या सुरुवातीला 35 ते 40 लाख टन साखर इथेनॉल साठी वापर अपेक्षित होता.

साखर उद्योगातील संघटनांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागात नोव्हेंबरच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये चार ते पाच दिवस सलग पाऊस झाला तोडणी काही काळ रखडली गेली तरी उसासाठी हा पाऊस फायदेशीर ठरला पाऊस पडण्या अगोदर फारशी समाधानकारक परिस्थिती नव्हती पण पावसानंतर मात्र ऊस आणि साखर उत्पादनासाठी पोषक स्थिती निर्माण झाली.

निर्बंध उठवले तर हंगामाला फायदा…

साऊथ इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या सूत्रांनी सांगितले की, कर्नाटक मध्ये 42 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता होती . परंतु आता या राज्यात 50 लाख टन साखर तयार होण्याची शक्यता आहे . कर्नाटक मध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात हंगाम बंद होण्याची चर्चा होती . पण आता बदलत्या परिस्थितीमुळे हंगाम 25 फेब्रुवारी पर्यंत जाईल अशी शक्यता आहे.

अनेक शेतकरी ऊस तातडीने जावा यासाठी  कारखान्याकडे सातत्याने संपर्क साधत आहेत.  एकीकडे अशी परिस्थिती असताना साखरेला मागणी नसल्याने साखरेचे दर घसरत आहेत . त्यामुळे कारखान्याला तोटाही सहन करावा लागत आहे. केंद्राने जर इथेनॉल निर्मिती बाबतचे पूर्ण निर्बंध उठवले तर उर्वरित हंगामाला याचा फायदा होऊ शकतो.

केंद्राने साखर टंचाईची भीती बाळगू नये..

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अंदाजापेक्षा साखर निर्मिती वाढत असल्याचे महाराष्ट्रातील संघटनांचे म्हणणे आहे.केंद्राला वाटते तशी बिकट परिस्थिती सध्या तरी नाही आधीच्या अंदाजापेक्षा देशाचे साखर उत्पादन 15 ते 20 लाख टणांनी वाढले आणि ही वाढ देशांतर्गत बाजारात  साखरेची पुरेशी उपलब्धता होण्यासाठी पुरेशी ठरेल.

यामुळे केंद्राने साखर टंचाईची भीती बाळगू नये असे आव्हान संघटनांनी केले आहे.  तेल उत्पादक कंपन्यांनी निर्बंध घालण्‍याअगोदर उत्पादित केलेल्या बी हेवी, ऊस रस आणि सिरप पासून तयार केलेल्या इथेनॉलचा उठाव ही लवकर करावा , अशी ही मागणी साखर उद्योगातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *