११ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने दुधाचे दर कमी झाल्यामुळे दुधाला प्रतिलीटर ५ रूपये अनुदान जाहीर केले होते. तर त्यानंतर आता दुधावरील या अनुदानाची मुदत आणखी एक महिन्यांनी राज्य सरकारने वाढवली आहे .
१० मार्चपर्यंत ५ रुपये अनुदान मिळणार
१० मार्चपर्यंत दूध उत्पादकांना दुधासाठी पाच रूपयांचे अनुदान मिळणार आहे. या बाबतचा शासन आदेश काढण्यात आलेला आहे. राज्यातील खासगी दूध संघ आणि सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर २४ ते २६ रूपयांचा दर मिळत आहे. राज्य सरकारने दूध उत्पादकांना ११ जानेवारीपासून प्रतिलीटल ५ रूपयांचे अनुदान जाहीर केले होते. केवळ एका महिन्यासाठी हे अनुदान होते. पुन्हा सरकारने या महिन्यामध्ये या अनुदानाची मुदतीमध्ये एका महिन्याची वाढ केली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना आता १० मार्चपर्यंत ५ रुपये अनुदान मिळणार आहे.
शेतकऱ्यांकडून दूध अनुदान मिळवण्यासाठी ज्या अटी व शर्ती घातल्या आहेत त्या जीवघेण्या असल्याचा आरोप करत आहेत . ज्या दूध उत्पादकांना २७ रूपये प्रतिलीटल दूध संघाकडून दर मिळाला आहे अशा दूध उत्पादक शेतकऱ्यांनाच दूध अनुदानाचा फायदा घेता येणार आहे अशी अट मागच्या शासन आदेशात घालण्यात आली होती. तसेच शेतकऱ्यांनी दूध अनुदानाची मुदत संपल्यानंतर काय करावे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.