कुटुंबाचा एकोपा ठरला प्रगतीचे कारण, वाचा सातारा जिल्यातील शिंगटे कुटुंबाची यशोगाथा…

सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात हळदीचे पीक हे सर्वाधिक प्रमाणात घेतले जाते. पाच बंधूंन सह शिंगटे यांचे २६ सदस्यांचे संयुक्त कुटुंब याच तालुक्यातील खडकी गावात राहतात .सर्व जण एकोप्याने राहतात .

एकमेकांच्या समन्वयाने दुसऱ्या दिवशीच्या कामांचे नियोजन एकत्र जेवण करत असताना होते. त्यांचावर सोपविलेली जबाबदारी प्रत्येक जण पार पडतात . कुटुंबाचा नियमच आहे कि कोणी कोणाशी अबोला धरायचा नाही आणि एकाने दुसऱ्याला मदत करायची . शेतीत मध्ये सर्वांच्या एकत्रित श्रमातूनच कुटुंबाने उल्लेखनीय प्रगती साधली आहे.

प्रत्येकाची स्वतंत्र जबाबदारी.. 

परिसरातील चार गावांमध्ये कुटुंबाचे शेतीक्षेत्र आहे. शेतीतील विविध कामांची विभागणी व जबाबदारी पाच बंधूंवर सोपवण्यात आली असून या कुटुंब्यातले अरविंद हे थोरले बंधू असून व त्यांनी काढणी पश्‍चात प्रक्रिया (विशेषतः हळद शिजवणी) , पीक व्यवस्थापन आदी जबाबदाऱ्या त्यांनी घेतल्या आहेत . ते वारकरी असून भक्तीमार्गात व समाजकारनातं व्यस्त असतात.

अजित हे दुसरे बंधू असून दुग्ध व्यवसाय सांभाळतात. तिसरे भाऊ दिलीप हे घरातील अन्य नियोजन,अवजारे, मोटर तसेच ट्रॅक्टर व शेती पाहतात. चौथे बंधू संपत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतून सेवानिवृत्त झाले असून ते कुटुंबाचे ताळेबंद व आर्थिक नियोजन पाहतात. धाकटे प्रशांत ह्यांनी ‘बीएस्सी ॲग्री’मध्ये शिक्षण घेतले आहे.

चारही बंधूंच्या पाठिंब्यावर ते शेतीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी खडकी विकास सेवा सोसायटीचे अध्यक्षपद सांभाळले आहे. त्या काळात हळद साठवणुकीची सोय संस्थेचे गोदाम उभारून केली. तारण कर्जाची सुविधा यात ठेवल्या जाणाऱ्या मालास उपलब्ध करून दिली. त्यांनी भूस्पंद शेतकरी मंडळाची स्थापनाही केली आहे.

शेतीच्या व्यवस्थापनाची पद्धत

वार्षिक पीक पद्धती ही व्यावसायिक, जोडीला हंगामी व पिके नगदी पिके अशी असते. ऊस हे दरवर्षी १२ ते १३ एकरांत सुरू हंगामातील असतो. उसाचा लागवडी तून एकरी ६० टनांपर्यंत, तर खो़डवा उसाचे ४० ते ४५ टन उत्पादन मिळते.

कारखान्याला दरवर्षी ऊस हा एकूण क्षेत्रातून सरासरी ७०० ते ७५० टन पुरविला जातो.सेलम जातीची हळद सरासरी सहा एकरांत असते. २० ते २५ क्विंटल प्रमाणे उत्पादन हे एकरी मिळते. दहा टक्के हळदीची पावडर करून एकूण उत्पादनाची विक्री होते. वाई येथील उर्वरित हळदीची विक्री बाजार समितीत होते. चारा पिकेही व ज्वारी, भुईमूग, भात आदी हंगामी पिके असून हळद हि लागवड केलेल्या क्षेत्रात पुढील चार ते पाच वर्षे फेरपालट म्हणून घेतली जात नाही. शेतीला संरक्षित ठेवणच्या पद्धती

पॉलिहाउस व शेडनेट हे प्रत्येकी दहा गुंठ्यांत आहे. संरक्षित शेतीत हि जिप्सोफिला ,निशिगंध, ग्लॅडिओलस, जरबेरा, शेवंती, लिमोनिअम अशी फुले तसेच फ्रेंच बीन्स , ढोबळी मिरची अशी विविधता त्यांनी जमली आहे. आपल्यासह अन्य शेतकऱ्यांचा फायदा लक्षात घेऊन पिझ्झा निर्मितीतसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट मिरची वाणाची करारशेती केली आहे.

शेतीला सिंचन हे सात विहिरी, जलकुंड व वॉटर हार्वेस्टिंग ’व दोन जलसिंचन उपसा योजना आदींवर आधारित केले आहे. संपूर्ण अवजारे संच हे पेरणीपासून ते मळणीपर्यंत आहे. तीन ट्रॅक्टर्स आहेत. जनावरे संगोपन कसे केले सुमारे ५० देशी कोंबड्या, ४० पर्यंत शेळ्या, चार- सहा गायी, दोन बैल व १२ म्हशी पर्यंत असे पशुधन आहे. दुधाचे रतीब असून ६० रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. दराने दरवर्षी २५ ते ३० बोकडांची विक्री ३०० रुपये प्रति किलो होते. देशी गायीचे शेण व मूत्र यांचा वापर करून गांडूळखत, जिवाणू , दशपर्णी अर्क, जीवामृत संवर्धक आदी निविष्ठा हे शेतातच तयार केल्या जातात.

शेतीतूनच प्रगती केली

कुटुंबातील नव्या पिढीनेही उच्च शिक्षण हे घेतले असून त्यातूनच पोलिस खाते ,अभियांत्रिकी, आदी शाखा वा त्यांचा सेवेत कुटुंबातील सदस्य उच्च पदांवर कार्यरत आहेत. शेती हि कुटुंबाचा मुख्य आधार आहे. शेतीतील उत्पन्नावर त्यांनी गावात वाडा, सात एकर शेती, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पुणे, सातारा येथे घरे घेतली आहेत . आई श्रीमती भागीरथी यांनी शिंगटे बंधूंना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *