कृषी विभागाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत २४५३ दावे निकाली काढले असून, त्यासाठी ४८ कोटी ६३ लाख रुपये वाटप करण्यास मान्यता दिली आहे.राज्यात २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीतील २३७६ दावे निकाली काढले आहे, त्यासाठी ४७ कोटी १२ लाख तर ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या १३८ दिवसांच्या खंडित कालावधीतील ७७ दाव्यांपोटी १ कोटी ५१ लाख रुपयांचा विमा वितरित करण्यात येणार आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी लागू करण्यात आली आहे. ७ एप्रिल २०२२ रोजी हि योजना लागू होणे आवश्यक होते . मात्र शेतकऱ्यांना काही प्रशासकीय कारणांमुळे ही योजना लागू झाली नसल्याने विमा संरक्षण मिळाले नव्हते. त्यानंतर ही योजना पुन्हा २२ ऑगस्ट रोजी लागू करण्यात आली होती. त्यामुळे एप्रिल ते ऑगस्टमधील १३८ दिवसांच्या खंडित कालावधीत शेतकऱ्यांचे दावे निकाली काढण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता दिली होती.
त्यानंतर या योजनेअंतर्गत १७ कोटी ८३ लाख रुपये वाटप करण्यात आले होते.७७ दावे निकाली काढणे या खंडित कालावधीतील बाकी होते. त्या मधील ७३ मृत्यूची प्रकरणे होती , तर अपंगत्वाची ४ प्रकरणे होती.
आता एक कोटी ५१ लाख रुपये त्या शेतकऱ्यांच्या वारसांना वाटप करण्यात येणार आहे. २३९ दावे याच टप्प्यातील निकाली काढण्यात आले आहे. त्यातील २३७ मृत्यू तर २ अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना ४२ कोटी ३६ लाख रुपयांची भरपाई देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
२१३७ दुसऱ्या टप्प्या मधील प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, २०९४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. व अपंगत्व ४३ शेतकऱ्यांना आले आहे. हे दावे निकाली काढण्यासाठी ४२ कोटी ३६ लाख रुपये वारसांना वितरित करण्यात येणार आहेत
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील दावे..
दावे : २४५३
शेतकरी मृत्यू : २३९८
शेतकरी अपंगत्व : ४९
भरपाई रक्कम : ४८ कोटी ६३ लाख