
Onion rate : एकीकडे चाळीतील कांदा खराब झाल्याचे नुकसान अन् दुसरीकडे कांद्याला उत्पादन खर्चाइतकाही भाव मिळत नसल्याने कांदाभावाचा नेहमीप्रमाणेच झालेला बांधा यामुळे शेतकरी वर्गाच्या तीव्र असंतोषातून आंदोलनांचे भडके उडू लागले आहेत. देवळा, सटाणा, उमराणे, लासलगाव, नामपूर, कापशी, एरंडगाव, सावतावाडी व इतर अनेक ठिकाणी सरकारच्या निषेधार्थ रास्ता रोको व आंदोलने, मोफत कांदावाटप, ग्रामसभांमध्ये अनुदानाचे ठराव, नाफेडचे ट्रक अडवणे अशा पद्धतीने असंतोष व्यक्त होत आहे.
येथील कसमादे भागात मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो. शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवलेला बहुतांश कांदा खराब झाला. भाव कोसळले आहेत. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. भाववाढीच्या अपेक्षेने राखून ठेवलेला उन्हाळी कांदा खराब झाला आहे. लाल कांदा टिकाऊ नसल्याने तो लगेच विकावा लागतो. निर्यातबंदीमुळे भाव घसरल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे. यावर्षी उन्हाळी कांदा सरासरी १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल विकला गेला, आणि 66 कांदा चाळींमध्ये ठेवूनही कांद्याचे भाव घसरत आहेत यामुळे शेतकऱ्यांचा संयम आता सुटत चालला आहे. शासनाने शेतकऱ्यांची परीक्षा पाहू नये. शेतकऱ्यांच्या मांगण्यांकडे दुर्लक्ष न करता कांदा भावाबाबत शासनाने संवेदनशील असावे अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होणार हे नक्की।” भगवान जाधव, जिल्हा समन्वयक, कांदा उत्पादक शेतकरी संघटना तो आता ७०० ते १००० असा घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्रसरकार विरोधी भावना आहे. त्याचे प्रतिबिंब विविध आंदोलनांच्या रुपाने पहायला मिळते आहे. ठिकठिकाणी कांद्याची आंदोलने यातून हेच प्रकषनि जाणवते आहे. कांद्याला हमीभाव मिळावा, कांदा निर्यात निर्बंधमुक्त असावी, विक्री केलेल्या कांद्यास अनुदान मिळावे अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. कारण कांद्याची ही अशी आंदोलने होत असली तरी ती अशा टप्प्यात सुरु आहेत, शेतकऱ्यांचा चाळीतील कांदा एकतर खराब झाला आहे किंवा खराब होण्याआधी विकला गेला आहे. त्यामुळे त्यांनाही काही अनुदानाच्या माध्यमातून मदत होणे आवश्यक आहे.
महामार्गावर रास्ता रोको
विंचूर उपबाजारात कमी भावामुळे संभाजीनगर
राज्य मार्गावर रास्ता रोको
उमराणे बाजारात भाव नसल्याने प्रांत कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा, घोषणाबाजी
नामपूर बाजार समितीसमोर दोन तास रास्ता रोको आंदोलन
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मागील आठवड्यात फोन आंदोलन
भावातील घसरणीमुळे उमराणे येथे नाफेडचे कांदा ट्रक अडवले
देवळा येथे ढोल वाजवून १५ क्विंटल कांद्याचे मोफत वाटप
कापशी (भावडे) ग्रामसभेत हमी भाव, अनुदान मागणी ठराव
एरंडगाव येथे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको
मालेगाव सुरत महामार्गावर कांदे ओतून रास्ता रोको