शेतकऱ्यांनो शेणखत उपलब्ध नाही, तर करा या सेंद्रिय खताचा वापर ,वाचा सविस्तर

शेतकऱ्यांनो शेणखत उपलब्ध नाही, तर करा या सेंद्रिय खताचा वापर ,वाचा सविस्तर

शेतकरी मित्रांनो , आजचा विषय थोडासा वेगळा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या वारंवार आम्हाला कमेंट येत होत्या की तुम्ही आम्हाला शेणखत वापरण्यास सांगत आहात . परंतु आमच्याकडे शेणखत उपलब्ध नाही, जरी असले तरी ते खूप महाग आहे . ते आम्हाला आमच्या पिकासाठी पण परवडणार नाहीये तरी त्याला पर्याय काय आहे? याच्या बद्दल सांगा .

शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे की शेण खताला उत्तम पर्याय काय आहे ,आणि त्याचा आपल्याला कशाप्रकारे वापर करता येईल? आपण जर थोडा शेतीचा किंवा वेगवेगळ्या अन्नद्रव्याचा थोडासा शास्त्रशुद्ध पणे अभ्यास केला तर शेणखत कधीच डायरेक्ट अन्नद्रव्याचा उत्तम साठा ठरू शकत नाही . शेणखत आपण कधीच खत म्हणून त्या ठिकाणी वापरू शकत नाही . शेणखत हे एक तुमच्या जमिनीची पोत सुधारणा करण्यासाठी एक उत्तम भूसुधारक म्हणून जर आपण वापरले तर तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होतो. शेणखतामध्ये पूरक ,पलाशचे प्रमाण खूप नगण्य असते . परंतु शेणखत टाकल्यानंतर जे काही जिवाणूंची जडणघडण होते. जी काही मातीची जडणघडण होते मातीचा पोत सुधारतो . दोन कणांमधील जी पोकळी आहे त्यामध्ये हवा खेळती राहते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारली जाते . त्याच्यामुळे आपल्याला शेणखत उत्तम भूसुधारक किंवा कमी जास्त प्रमाणामध्ये उत्तम खत म्हणून शेणखत मदत करते.

 तर तुम्हाला समजले असेल शेणखताचा डायरेक्ट उपयोग नत्र स्फुरद साठा म्हणून होत नाही तर शेणखत एक उत्तम भूसुधारक आहे . शेणखत जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर काय पर्याय आहे ?मी सांगू इच्छितो की शेणखताला एकमेव शेणखत पर्याय ठरू शकतो . तरी देखील कमी जास्त प्रमाणामध्ये मी तुम्हाला काही पर्याय या ठिकाणी सांगणार आहे, जर तुम्हाला त्याठिकाणी ते उचित वाटले तर तुम्ही वापर करू शकता . शेणखत जमिनीची जडणघडण तसेच जमिनीचा पोत सुधारतो मग हेच कार्य आणखीन कोण कोण करत आहे.

हिरवळीचे खते

तर आपण जर पाहिलं तर ती आहेत वेगवेगळी हिरवळीचे खते , तुम्ही जर वेगवेगळे हिरवळीची खते तुमच्या प्लॉटमध्ये तुमच्या शेतामध्ये वर्षातून एकदा घेतली व फुलं अवस्थेमध्ये आणून ती जर जमिनीमध्ये गाडली तर नक्कीच तुमच्या जमिनीची जडणघडण सुधारली जाईल . हिरवळीची खत म्हणजेच ताग असेल ढेंच्या ,शेवरी ही पिके आपल्या जमिनीमध्ये घ्यायची आहेत . चांगलं पाणी आणि खत देऊन फुलोरावस्थेमध्ये आणायची आहेत व जमिनीमध्ये गाडून टाकायचे आहेत अशाप्रकारे तुम्ही तुमच्या जमिनीचा पोत नक्की सुधारू शकता.

कोंबडखत

आणखीन एक पर्याय आहे तो म्हणजे कोंबडखताचा बऱ्याच पोल्ट्री फार्म मध्ये तुम्हाला कोंबड खत बऱ्यापैकी आता स्वस्त मिळत आहे. हे कोंबडखत तुम्ही जर दर वर्षी एकदा तुमच्या जमिनीमध्ये 700 ते 1000 किलोच्या दरम्यान जर तुम्ही टाकलं तर नक्कीच तुमच्या जमिनी मध्ये एक अन्नद्रव्याचा चांगला साठा आणि जमिनीसाठी एक भूसुधारक म्हणून त्याठिकाणी काम करेल.

गांडूळ खत

शेणखताला आणखीन एक तिसरा पर्याय जर आपण पाहिला तर तो आहे, गांडूळ खताचा, गांडूळ खत हे चांगल्या प्रकारचे उत्तम भू सुधारक म्हणून वापर करू शकता . तुम्ही जर गांडूळ खताचा वापर एकरी दोन ते अडीच टन तुम्ही त्या ठिकाणी केला तर तुमच्या जमिनीची चांगली जडणघडण होऊ शकते आणि एक तुम्हाला चांगल्या प्रकारचे खत म्हणून देखील त्या ठिकाणी ते मदत करू शकते . याच्या नंतर जर पाहिलं तर वेगवेगळ्या स्लरी चा वापर तुम्ही करू शकता, जिवाणूची स्लरी असेल, जीवामृत असे वेगवेगळे शेणखतापासून आपण स्लरी तयार करतो. या स्लरीचा जर तुम्ही 15 ते 20 दिवसांच्या अंतराने तुमच्या शेतामध्ये वापर केला तर या देखील तुम्हाला एक उत्तम प्रकारचा पर्याय म्हणून तुमच्या समोर येऊ शकतात.

 धान्याचा भुसा

आणि आणखीन काय करू शकता तर तुम्ही तुमच्या पिकाची काढणी केल्यानंतर भरडणी केल्यानंतर ज्या ठिकाणी भुसा शिल्लक राहतो तो भुसा देखील तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे सेंद्रियखत म्हणून तुमच्या शेतामध्ये टाकता येते . भुसा म्हणजे गहू असेल बाजरीचा भुसा असेल की जो आपण शेतामध्ये टाकू शकतो . सोबतच तुम्ही उसाचे पाचट तुमच्या शेतामध्ये कुजवले तर ते देखील खूप छान प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला एक सेंद्रिय खत म्हणून काम करणार आहे. याच्यानंतर जे काही कारखान्याची प्रेसमेड (मळी) आपल्याला मिळते. आता भरपूर सारे कारखाने सुरू झाले आहेत. 

कारखान्याची प्रेसमेड,

कारखान्यांमधून निघणा-या प्रेसमेड देखील तुम्ही जर व्यवस्थित प्रक्रिया करून म्हणजे गरम डायरेक्ट शेतामध्ये टाकू नका, त्या आणल्यानंतर शेताच्या बाहेर थोडसं तुम्हाला एक दोन वेळा ते पलटी करायचे आहेत ,त्याची उष्णता निघून गेल्यानंतर प्रेसमड नक्कीच तुम्ही तुमच्या शेतामध्ये एक सेंद्रिय खत म्हणून वापरू शकता . याच्या नंतर निंबोळी पेंडीचा वापर देखील एक उत्तम सेंद्रिय खत आणि भूसुधारक म्हणून तुम्ही करू शकता . निंबोळी पेंडीचे मात्रा आहे दीडशे ते दोनशे टन प्रती एकर . आणखीन तुम्हाला जर सेंद्रिय खतांमध्ये सांगायचं झालं तर बोन मिल आहे फिष्मील आहे यांचा देखील वापर तुम्ही तुमच्या शेतामध्ये उपलब्धता असेल तर तुमच्या भागामध्ये तुम्ही करू शकता . जास्त विषय मोठा नाहीये आपण फक्त कवर करणार होतो की शेणखताला उत्तम पर्याय काय आहेत .

यापैकी जो पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तो नक्कीच वापरू शकता. परंतु माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, की तुम्हाला सेंद्रिय खत तुमच्या शेतामध्ये वापरने भागच आहे. कमी-जास्त प्रमाणात ते वापरले तरी चालेल म्हणजेच निदान शंभर टक्क्यांपैकी 40% तरी तुम्हाला हे प्रमाण ठेवायचे आहे . ६० टक्के शेती ही रसायने करा परंतु 40%शेती तुम्हाला सेंद्रियखते वापरून करा. मी समजू शकतो सेंद्रियखते खूप महाग आहेत उपलब्धता कमी आहे . आपल्याला झटपट होण्यासाठी कमी खर्चा मध्ये आपण रासायनिक खतांचा वापर करतो. परंतु हा एक तुम्हाला निरंतर आणि लॉन्ग टाइम पर्याय ठरू शकत नाही आपल्याला दोन्हींचा बॅलन्स होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *