पीक कर्जफेड केलेल्या सभासदांना एप्रिल महिना सुरू झाल्याने नवीन पीक कर्जाची प्रतीक्षा लागली आहे तसेच कागदपत्रांची जुळवाजुळव ही बँका व विकास संस्थांमध्ये सध्या सुरू आहे. दरवर्षी बँका व विकास संस्था तांत्रिक समिती व कर्जदार धोरण मंजुरीनुसार एप्रिल पासून नवीन वर्षासाठी पीक कर्ज वाटप करत असतात.
या वर्षी खालील प्रमाणे जिल्हा बँकेने मंजूर केलेले पीक कर्जाची मर्यादा ठरविण्यात आली आहे. बागायत कापूस ५० हजार ६०० रुपये,जिरायत कापूस हेक्टरी ४४ हजार तर केळी-एक लाख चार हजार पाचशे, टिश्यू कल्चर केळी- १ लाख ५४ हजार , ऊस (आडसाली,पूर्व हंगामी,सुरू व खोडवा) ८८ हजार रुपये प्रति हेक्टरी, या प्रमाणे कर्ज वाटप होणार असून . बाजरी २५ हजार, मका ३२ हजार ७५०,तीळ २७ हजार ५०० रुपये कर्ज वाटप करण्यात येणार आहे.याशिवाय ज्वारी ३० हजार रुपये प्रति हेक्टर.
जिल्हा बँकेमार्फत जिरायती, बागायत खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील एकूण ७६ पिकांसाठी अल्प मुदत पीककर्ज वाटप करण्यात येणार आहे. तर २ हेक्टरपर्यंत हळद, बटाटा, आर्वी या पिकांसाठी कर्जपुरवठा करण्यात येणार आहे.
बऱ्याच भागात नदीच्या पलीकडे जिल्हा बदलत असतो .काही शेतकऱ्यांच्या जमिनी नदी पलीकडे असल्यामुळे त्यांना त्या तालुक्याचे असिस्टंट रजिस्ट्रार व जिल्हा रजिस्ट्रार (डी डी आर) यांच्या परवानगीची अट घालण्यात आल्यामुळे पीक कर्ज वाटपास वेळ लागू शकतो. असे ४१ कर्ज घेणारे सभासद येथील विकास संस्थेमध्ये आहेत.
गावनिहाय कर्ज वाटप कोटीच्या घरात
एका गावामध्ये सुमारे ५ कोटी रुपये कर्ज वाटप होते.त्यामध्ये काही सभासद विकास संस्थेमार्फत जिल्हा बँकेतून कर्ज घेतात तर काही बँका कर्ज देतात तर .येथील विकास संस्थेमध्ये ४२४ कर्जदार सभासद असून मागीलवर्षी एक कोटी ९० लाख रुपये कर्जवाटप फक्त संस्थेमार्फत करण्यात आले होते. संस्थेचे दोन कोटी २३ लाख मेंबर कर्ज व एक कोटी ७० लाख बँक कर्ज असल्याचे सचिव प्रकाश राणे यांनी सांगितले