Cotton Seeds : दर्जेदार कापूस बियाणे लवकरच शेतकऱ्यांना मिळणार स्वस्तात..

सध्या कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना महागड्या किंमतीत घ्यावे लागत असून पावसाने ओढ दिल्यास त्यांच्यापुढे दुबार पेरणीचे संकट येते. त्यातून त्यांचा खर्च वाढतो. मात्र या सर्वांवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने आयसीएआरच्या शास्त्रज्ञांना सूचना केल्या असून आगामी काळात कपाशीचे स्वस्त आणि दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना मिळू शकते.

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कापसाच्या बियाण्यांच्या उच्च किमतीबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की “खाजगी कंपन्या शेतकऱ्यांना अत्यंत उच्च किमतीत बियाणे विकतात. आयसीएआर ने याकडे लक्ष द्यावे की शेतकऱ्यांना कमी किमतीत दर्जेदार बियाणे मिळतील. तसेच त्यांनी शेतकऱ्यांकडेही लक्ष द्यावे जेणेकरून त्यांना कापसाच्या शेतीतून फायदा मिळेल आणि शेतीतून उदरनिर्वाह करता येईल,’’ अशी सूचनाही त्यांनी शास्त्रज्ञांना केल्या.

आयसीएआर- भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्यात कृषी मंत्री मार्गदर्शन करत होते. 100 वर्षांपूर्वी 1924 मध्ये आयसीएआर ही प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली. त्याचा आता शताब्दी सोहळा सुरू आहे.

कापूस वेचणीच्या यांत्रिकीकरणावर भर
शिवराजसिंह चौहान म्हणाले की, “या संस्थेत सध्या कापूस वेचणीच्या यांत्रिकीकरणावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कापूस शेती टिकवण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी (सीआयआरसीओटी) ही अशी एकमेव संस्था आहे जी यांत्रिकरित्या वेचलेल्या कापसावर प्रक्रिया करण्याचे काम करते. यासाठी झाडे व यंत्रे यांत्रिक कापूस वेचणीसाठी अनुकूल बनवण्याची आवश्यकता आहे.

या संस्थेच्या 100 वर्षांच्या पूर्णतेच्या निमित्ताने येथे पायलट प्लांट सुविधा उभारण्यात येणार आहे. याशिवाय, कापसाच्या जीनोमसाठी आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून ही संस्था विकसित करण्यासाठीही आवश्यक ती व्यवस्था केली जाईल.

कापूस व्यापारासाठी ट्रेसिबिलिटी प्रणाली विकसित करण्याचे महत्त्व
चौहान म्हणाले की, “कापसाच्या व्यापारासाठी ट्रेसिबिलिटी प्रणाली विकसित करणे खूप महत्त्वाचे आहे. भारतीय कापसाच्या निर्यातीसाठी नवीन ट्रेसिबिलिटी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी येथे सर्व आवश्यक सुविधा विकसित केल्या जातील आणि हा प्रयत्नही शेतकऱ्यांसाठीच आहे.”10:55 AM

 
 

Leave a Reply