मोठी बातमी ! अखेर कांद्यावरील 40% निर्यात शुल्क मागे..

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावरील 40% निर्यात शुल्क लावला होता.  सरकारच्या  या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवत अनेक दिवस शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली . बरेच दिवस बाजार समित्या बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. मात्र आता कांद्यावर लावण्यात आलेले 40% निर्यात मागे घेण्यात आले आहे. 40% निर्यात शुल्क केंद्र कडून मागे घेण्यात आल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचना काढली आहे.

मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर नवीन नियम लावले आहे . कांदा इतर देशात निर्यात करण्यासाठी 800 डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यातमूल्य लागू राहणार आहे.  31 डिसेंबर पर्यंत हे निर्यात शुल्क लागू करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे . कांद्याचा साठा संपूनही शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा. भाव स्थिर राहावे या दृष्टीने निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.

सध्या शेतकऱ्यांकडे कांद्याचा साठा संपत आल्याने  बाजारात कांद्याची आवक कमी आहे.  त्यामुळे कांदा दरात झपाट्याने   वाढ होत आहे.  किरकोळ बाजारात कांद्याचे दर 100 रुपये किलो पर्यंत पोहोचले आहेत.  कांद्यावरील 40% निर्यातशुल्क मागे घेण्यात आले असले तरीही निर्यात करण्यासाठी 800 डॉलर मॅट्रिक टन ही किंमत अनिवार्य करण्यात आली आहे.

नेमका केंद्र सरकारचा नवीन नियम काय?

यावर डॉक्टर भारती पवार म्हणाल्या की,  जर तुम्हाला अन्य देशांमध्ये कांदा एक्सपोर्ट करायचा असेल तर त्याची मिनिमम एक्सपोर्ट प्राइज ही 800 डॉलर मॅट्रिक टन असली पाहिजे आणि इथल्या दराचा विचार करता तिथल्या मागणीचा विचार करता हा बॅलन्स झाला पाहिजे त्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.  ज्या देशाची मागणी असेल तर 800 डॉलर हा एक एमएपी ठरवून दिली आहे.  याला  एक्सपोर्ट प्राईस म्हटले जात आहे.  त्या व्यतिरिक्त कुठलीही आकारणी राहणार नाही . म्हणजे ज्या प्रकारे निर्यात शुल्क मागे घेतले आहे.  मिनिमम प्राईस   800 डॉलर असली पाहिजे ही त्यामागील अट आहे.  सध्या कांद्याचा साठा कमी झाला असून देखील त्याचा देखील विचार करावा लागणार आहे .

दोन्ही गोष्टींचा विचार करता जर तुम्हाला एक्स्पोर्ट करायचे असेल तर त्या देशाच्या मागणीमध्ये पण हा रेट कमीत कमी असला पाहिजे.  म्हणजे जशी मागणी वाढते जशी आवक वाढते . जसा दर आहे.  तसं त्या देशातल्या रेटचा पण विचार केला जात आहे.  जेणेकरून शेतकऱ्यांना पण फायदा झाला पाहिजे.  त्यामुळे केंद्राने सद्यस्थितीत  घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप चांगला असून सध्या आवक घडलेली आहे.  परंतु आता मार्केट रेट बाजार भाव चांगला मिळत आहे.  असे भारती पवार यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *