shetkari abhyas doura : देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान जाणून घ्या सविस्तर माहिती..

shetkari abhyas doura : विदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि नवकल्पनांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागामार्फत एक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा उद्देश म्हणजे राज्यातील निवडक शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगत शेतीचे अनुभव मिळवून देणे, जे त्यांच्या स्वतःच्या शेती व्यवस्थापनात गुणात्मक बदल घडवू शकतील.

 

➡️योजनेचा स्वरूप व प्रक्रिया

कृषी विभागामार्फत ही योजना राबवली जाते आणि इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करण्याची संधी दिली जाते.

शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्याच्या कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो.

अर्ज स्वीकारल्यानंतर जिल्हास्तरावर सोडत पद्धतीने निवड प्रक्रिया पार पडते आणि त्या आधारावर शेतकऱ्यांची निवड होते.

निवड झाल्यावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत निवड बाबत माहिती दिली जाते.

निवड झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी आयुक्तालय हे दौऱ्याचे आयोजन करते.

 

➡️ अनुदानाचे स्वरूप व रक्कम

योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्याला एकूण दौरा खर्चाच्या ५०% पर्यंत किंवा कमाल ₹१,००,००० इतके अनुदान मिळते.

उदाहरण: जर दौऱ्याचा एकूण खर्च ₹१,८०,००० असेल, तर अनुदान ₹९०,००० किंवा ₹१,००,००० यातील जी रक्कम कमी असेल ती मिळेल.

अनुदान मिळाल्यानंतर उर्वरित खर्च शेतकऱ्याला स्वतःकडून भरावा लागतो आणि तो फक्त कृषी विभागाकडून अधिकृत सूचना प्राप्त झाल्यानंतरच भरायचा असतो.

 

➡️ महत्त्वाच्या सूचना

दौऱ्याचे आयोजन प्रत्यक्ष होण्यापूर्वी कोणत्याही एजन्सी, प्रवासी कंपनी अथवा व्यक्तीस कोणतीही रक्कम देणे आवश्यक नाही.

काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असून त्यात सहभागासाठी पैसे भरण्याबाबत संदेश दिले जात आहेत. अशा फसवणुकीपासून सावध राहणे अत्यावश्यक आहे.

अशा अफवांवर विश्वास न ठेवता केवळ शासकीय अधिकृत सूचनांवर आधारित कृती करणे आवश्यक आहे.

या योजनेत शेतकऱ्यांची निवड आणि नियोजन प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून कृषी विभागाची जबाबदारी असून तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवावी.