देशातून नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास 26 सप्टेंबर पासून होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या शेवट पर्यंत उत्तर भारतातील बऱ्याच भागातून मान्सून परतण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तर सप्टेंबरला संध्याकाळ नंतर वादळी पावसाची शक्यता असल्याची माहिती ब्रिटनचे हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर अक्षय देवरस यांनी दिली.
17 सप्टेंबरला राजस्थानच्या पश्चिम भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. त्यानंतर 5 ऑक्टोबरच्या आसपास मान्सून महाराष्ट्राच्या उत्तर भागातून परत जातो. उर्वरित राज्यामधून जाण्यासाठी मान्सूनला पाच ते दहा दिवस लागतात . 10 ऑक्टोंबर पर्यंत मान्सून राज्यातील बराच परत गेलेला असतो. 1975 ते 2020 या कालावधीमध्ये आत्तापर्यंत मान्सून परतीच्या तारखांवर जर नजर टाकली तर 2005 साली 2 सप्टेंबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता त्यानंतर 2007 साली 30 सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरू झाला होता म्हणजेच मान्सूनच्या आगमनाच्या तारखांपेक्षा मान्सूनच्या परतीच्या तारखांमध्ये विविध दिसून येते.
मान्सून परतीचा प्रवास नेमका काय?
जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जेव्हा भारतात मान्सून सक्रिय असतो तेव्हा आपल्याला दोन प्रकारच्या वाऱ्यामध्ये युद्ध पाहायला मिळते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान इराण मध्ये कोरडी हवा असते तर या उलट बंगालच्या उपसागर अरबी समुद्रकिनारपट्टी भागातील हवेत आद्रता असते.
भारतात या दोन वाऱ्यांमध्ये युद्ध सुरू असते. त्यामध्ये कोणते वारे हे अधिक शक्ती शाली आणि प्रभावी आहे. त्यावर मान्सून कसा असणार हे निश्चित केले जाते. याचे उदाहरण द्यायचे झाले तर ऑगस्ट 2023 मध्ये जो पाऊस पडला तो 2001 पासूनच्या ऑगस्ट महिन्यातील पावसाचा विचार करता , यावर्षी सर्वात कमी पाऊस पाहिला मिळाला. दोन पावसाचे खंड ऑगस्टमध्ये पाहायला मिळाले. पाकिस्तान अफगाणिस्तान व इराण मधून मोठ्या प्रमाणात कोरडी हवा भारतात आली होती. परिणामी या वाऱ्याचा परिणाम पावसावर झाला . 15 सप्टेंबर किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये तर मान्सूनच्या वाऱ्याचा वेग मंद होतो. ज्यामुळे कोरडी हवा भारतात येते. अशी कोरडी हवा भारतात येते तसा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो.
राज्यात तूट कायम राहण्याची शक्यता..
सध्याची स्थिती पाहिली असता पण तिचा प्रवास सुरू झालेला नाही. परतीचा प्रवास कधी सुरू होईल याबाबत कोणती अधिकृत घोषणा अध्यापही आलेली नाही. परंतु हवामानाची स्थिती पाहता देशातून नैऋत्य माणसांचा परतीचा प्रवास 26 सप्टेंबर पासून होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर 5 ऑक्टोबर नंतर परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या शेवटपर्यंत संध्याकाळनंतर वादळी पावसाचा अंदाज असून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची सरासरी अजूनही मोठी तूट आहे . पाऊस मोठा होणार नसल्याने तूट कायम राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज डॉक्टर अक्षय देवरस यांनी वर्तवला आहे.












