बरेच लोकांना यासाठी अर्ज कुठे करायचा अर्ज कसा भरायचा हा अर्ज मुख्य मंत्री कार्यालयातून घ्यायचा आहे का? असे अनेक प्रश्न जे रुग्ण आहेत व त्यांच्या नातेवाईकांना पडतात.सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधी या कक्षाकडून त्यावर आता तोडगा काढण्यात आलेला असून ८६५०५६७५६७ या मोबाईल नंबर वर मिस कॉल दिल्यावर मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज आपल्या मोबाईलवर येतो.
शिंदे -फडणवीस सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून विविध दुर्धर आजारांवरील उपचार, शस्त्रक्रियांसाठी आठ हजार रुग्णांना साठ कोटी अठेचाळीस लाख इतक्या मदतनिधीचे वाटप केले. दर महिन्याला वैद्यकीय मदतीसाठी दीड ते दोन हजार अर्ज दाखल होतात,त्यापैकी एक हजार अर्ज मंजूर होतात.
रुग्णांनी अर्ज केल्याच्या सात दिवसात त्यांना वैद्यकीय मदत संबंधित रुग्ण ज्या दवाखान्यात आहे त्या दवाखान्याच्या खात्यात हा निधी जमा होतो. हा अर्ज घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीच्या मंत्रालयातील कक्षापर्यंत पोहोचणे हे ग्रामीण भागातील लोकांनां जमत नाही. म्हणून सरकारने मिसकॉलची सुविधा दिली आहे.
या नंबरवर मिसकॉल दिल्यावर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे मोबाइलवर येईल. त्या लिंकवर क्लिक करताच अर्ज डाऊनलोड होईल. प्रिंट आऊट काढून तो भरावा. आवश्यक कागदपत्रांसह पोस्ट, स्कॅन करून किंवा प्रत्यक्ष पीडीएफ स्वरूपात cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवता येईल, असे सांगण्यात आले आहे
या नीधीसाठी सर्वात जास्त अर्ज हे कर्करोगावरील उपचाराच्या मदतीसाठी असतात हे प्रमाण एकूण अर्ज पैकी 25% एवढे आहे त्याच्या मागोमाग अपघात,खुबा प्रत्यारोपण, किडनीविकार , डायलिसिस,हृदयविकार, गुडघा प्रत्यारोपण, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले की या आजाराच्या मदतीसाठी अर्ज येत आहेत.
या निधीतील आजारांच्या यादीत भाजलेल्या तसेच शॉक लागलेल्या रुग्णांचाही समावेश करण्यात आला आहे.अशा रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपयांची मदत देण्यात सुरुवात केली आहे.
हा अर्ज भरताना पूर्ण भरावा अर्जासाठी एक ॲप तयार केलेले असून त्यावर सर्व माहिती चे अर्ज स्वीकारले जातील यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना कोणत्याही कक्षाशी संपर्क करण्याची गरज भासणार नाही