कळमेश्वर तालुक्यातील बाबाराव उपाख्य नीळकंठ कोडे यांनी अद्रक (आले) लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवले ,वाचा प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा ..

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसू नये आणि शेती तोट्यात जाऊ नये म्हणून शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतकरी वर्ग वेगवेगळे पर्याय शोधत असतात व त्यावर प्रयोगही करताना दिसत आहेत. बाबाराव उपाख्य नीळकंठ कोडे हे कळमेश्वर तालुक्यातील आहेत त्यांनी अद्रक (आले) लागवडीतून धम्माल केली आहे. आल्याची शेती करणारे ते तालुक्यातील पहिलेच शेतकरी आहेत.

तेलकामठी परिसरामध्ये जिरोला (रिठी) येथे बाबाराव कोदे यांची २२ एकर डोंगराळ जमीन आहे. येथील भूगर्भात ८०० फूट खोलपर्यंत काळा दगड आहे. त्यामुळे शेती ओलिताखाली आणण्यासाठी त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन त्यांनी तेलकामठीतील केसरनाला तलावातून दोन किमी अंतरावर पाइपलाइन टाकत शेतातील विहिरीत व शेततळ्यात पाणी आणले. त्यांच्या २२ एकर जमिनीपैकी १२ एकरामध्ये त्यांनी १५०० संत्रा झाडे, तर एक हेक्टरमध्ये ५६० मोसंबीची झाडे आहेत. यासोबतच अद्रकाची लागवड ते गेल्या पाच वर्षापासून करत आहेत.

मागील वर्षी अद्रक महाग असल्यामुळे जास्त प्रमाणात त्यांनी विक्री केली. उर्वरित अद्रकाच्या बियाणांपासून त्यांनी यंदा पाऊण एकरामध्ये अद्रकाची लागवड केली होती. या अद्रक लागवडीतून त्यांना ५० क्विंटल अद्रकाचे उत्पादन झाले. प्रतिकिलो १०० रुपये दराने अद्रक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना ते यावर्षी विकले आहे.

बेड पद्धतीचा वापर अद्रकाची लागवड करण्यासाठी करण्यात येतो. अद्रक शेती साठी पाण्याचे व खतांचे नियोजन ठिबक सिंचनाद्वारे करण्यात येते. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यानंतर केव्हाही अद्रकाची काढणी करू शकतो . यावर्षी ते अडीच एकरावर आल्याची लागवड करणार आहेत.

त्यांनी मोर्शी परिसरात असलेल्या नातेवाइकाकडून आल्याच्या (अद्रक) शेतीची माहिती घेतली. त्यानंतर मोर्शी येथून बियाणे आणले आणि लागवड केली. मागील वर्षीपर्यंत अडीच एकर क्षेत्रात उत्पादन ते घेत होते . आता ते स्वतःच उत्पादित केलेल्या आल्याचे बियाणे लागवडीसाठी ठेवत असतात . अद्रक खरेदीसाठी शेतकरी संपर्क साधतात तर उर्वरित अद्रक हे कळमना मार्केट विकले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *