द्राक्ष पिकासाठी विमा योजना अधिसूचित जिल्ह्यामधील अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे . या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर शासनमार्फत उभारलेल्या संदर्भ हवामान केंद्रावरील आकडेवारी गृहीत धरण्यात येते .
या योजनेअंतर्गत द्राक्ष दोन वर्ष वय झालेल्या पिकांसाठी राज्याचे दोन भाग केले असून त्या त्या भागानुसार हवामान धोके व नुकसान भरपाई रक्कम यात बदल आहे द्राक्ष पिकास खालील नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस(आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण निश्चित केले आहे.
द्राक्ष (अ) समाविष्ट जिल्हे– नाशिक , अहमदनगर, धुळे व बुलढाणा (४ जिल्हे)
द्राक्ष (ब ) समविष्ट जिल्हे – सांगली,सोलापूर,पुणे,औरंगाबाद,उस्मानाबाद,जालना,सातारा,बीड,लातूर,नांदेड व कोल्हापूर (११ जिल्हे)
विमाधारक शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे नुकसान झाल्यास नुकसान झाल्यापासून ७२ तासाच्या आत नुकसानीची माहिती विमा कंपनीला किंवा संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर नुकसानग्रस्त क्षेत्राचे वैयक्तिक पंचनामे करून नुकसानीचे प्रमाण निश्चित केले जाणार आहे.
द्राक्ष पिकासाठी योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 15 ऑक्टोंबर 2023
शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता
हवामान धोके विमा संरक्षित रक्कम रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर कमी तापमान – ३,२०,००० – १६०००
गारपीट- १०६६६७ – ५३३४
योजनेमध्ये कार्यान्वित करणारी यंत्रणा
जिल्हा विमा कंपनी नाव पत्ता
1) नगर, नाशिक, अमरावती ,सिंधुदुर्ग, वाशिम ,धुळे, यवतमाळ ,सोलापूर, पालघर ,नागपूर, नंदुरबार ,रत्नागिरी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
2) बीड ,छत्रपती संभाजी नगर, वर्धा, ठाणे ,अकोला ,सांगली, सातारा, हिंगोली, परभणी, जालना ,कोल्हापूर, लातूर ,एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी.
3) रायगड ,जळगाव, बुलढाणा, पुणे ,नांदेड, धाराशिव, भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड.
शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग
1) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळ पिकांसाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणारे, शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात. परंतु भाडे करार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
2) पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी ऐच्छिक राहणार आहे.
3) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाईन पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड ,जमीन धारणा सातबारा, 8 अ उतारा व पीक लागवड व स्वयंघोषणापत्र, स्वयं फळबागेचा (Geo Tagging)केलेला फोटो ,बँक पासबुक वरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येईल.
4) एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागु असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो. परंतु त्या फळ पिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे.
5) एक शेतकरी चार हेक्टर च्या मर्यादेमध्ये विमा संरक्षण घेऊ शकतो.
6) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता विमा सुरक्षित रकमेच्या पाचच्या मर्यादित असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान म्हणून देण्यात येतो. परंतु विमा हप्ता 35% पेक्षा जास्त असल्यास विमा हप्ता शेतकऱ्यांना पाच टक्के पेक्षा जास्त भरावा लागतो.
7) या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकांसाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्याचे नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
8) अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.