कोकणचा हापूस बाजारात आला आहे ,या वर्षी आंब्याचे दर कसे राहतील ? जाणून घ्या सविस्तर ..

सर्वांना उन्हाळा आला की आंब्याची आठवण येत असते . आंबा म्हणेल की आपल्या सर्वांच्याचे आवडतीचे फळ आहे. या वर्षी आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे,तसेच पहिल्या टप्प्यामधील आंबा बाजारात आला आहे. रत्नागिरी, देवगड, आणि कर्नाटकी हापूस आंब्याची आवक पुणे बाजार समितीमध्ये झाली आहे. त्यामध्ये देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याला जास्त दर तसेच कर्नाटकी आंब्याला कमी दर आहे.

आंब्याचा हंगाम १५ मार्चला दरवर्षी सुरू होत असतो. परंतु यावर्षी एक महिना अगोदर म्हणजे १५ फेब्रुवारीला आंब्याची आवक सुरू झाली असून तर काही प्रमाणावर हापूस आंब्याची आवक पुणे बाजार समितीमध्ये मागच्या एका महिन्यापासून सुरू झाली होती. गेल्या महिन्यात आंब्याची आवक जास्त होती तर आंब्याची आवक मार्चच्या सुरूवातीच्या आठवड्यामध्ये कमी होती असे तेथील आडतदारांनी सांगितलं.

पुणे बाजारात व्यापाऱ्यांकडून सहा ते साडे सहा हजार रूपयांना रत्नागिरी हापूस आंब्याची ७ डझनची पेटी विक्री केली जात आहे. त्याच प्रमाणे प्रतिपेटी ३ हजारांपासूनही रत्नागिरी हापूस आंब्याची विक्री केली जात आहे . त्याचा दर प्रतवारीनुसार निश्चित केला जातो असेही आडतदारांनी माहिती दिली  . तसेच , रत्नागिरी हापूस आंब्याची चांगल्या कॅलिटीची साडेतीन डझनाची पेटी चार हजार पाचशे रूपयांना विकली जात आहे. मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडे देवगड हापूस आंब्याच्या ६ डझनच्या एका पेटीला ६ हजार रूपयांचा दर मिळत आहे.

कर्नाटकी आंब्याला कमी दर.. 

कर्नाटकी हापूस आंब्याची आवक मागील एका आठवड्यापासून सुरू झाली आहे. पुणे बाजार समितीमध्ये दोन डझनच्या एका पेटीला ग्राहकांना ८०० रूपये ते १ हजार रूपये मोजावे लागत आहेत. बरेच वेळा ग्राहकांना कर्नाटकी हापूस आणि देवगड हापूस व रत्नागिरी यांच्यामधील फरक कळत नाही .

या वर्षी आंब्याला चांगला मोहोर आला होता परंतु त्यामधील ६० टक्के मोहोर रोगामुळे खराब झाला. मध्येच अवकाळी पाऊस मोहोरचे नुकसान झाले . यावर कृषी विभागाकडून किंवा विद्यापिठयांकडून कोणताच यावर रिसर्च झाला नाही . तसेच औषधांचा खर्च ,मजुरी, खते, च्या किमती वाढल्या आहेत . त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. परंतु शेतकऱ्यांचा आंबा मागील वर्षीच्या तुलनेत चांगल्या क्वालिटीचा आहे.

यंदा आंब्याचे उत्पादन दरवर्षीच्या तुलनेत वाढले असून येणाऱ्या काळात अतिवृष्टी,हवामानात बदल,गारपीट, अवकाळी,अशा नैसर्गिक आपत्तीचा अडथळा आणला नाही तर मोठ्या प्रमाणावर आंब्याची आवक असेल . असे झाले तर आंब्याच्या किंमती स्थिर असतील किंवा कमी होतील परंतु सध्या तरी या वर्षी आंब्याचे दर जास्त वाढण्याची शक्यता नाही.
– बलराज भोसले (आंब्याचे व्यापारी, पुणे बाजार समिती)

Leave a Reply