कष्ट आणि प्रयोगशीलता हेच धन, वाचा सविस्तर ..

नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्याच्या पश्चिम भागातील काजवा व काजळी नदीच्या संगमावर वसलेले कारसूळ हे गाव आहे.  पत्री सरकारच्या काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी गावाला भेट दिल्याच्या आठवणी ग्रामस्थ सांगत असतात.  गाव तसं छोटे आहे.  लोकसंख्या 2619 एवढी आहे.  मात्र शेतीत प्रयोगशील, सामाजिक, राजकीय अध्यात्मिक अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे. पारंपरिक हंगामी पिके गावात होतात.

सन 1973 मध्ये कै. पंढरीनाथ रामचंद्र पगार त्यानंतर संपतराव रामचंद्र शंक पाळ आधी प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावात द्राक्ष लागवडीचा श्री गणेशा केला.  पारंपरिक पिकांच्या तुलनेत उत्पन्न अधिक मिळत असल्याचे लक्षात येताच अन्य शेतकरी देखील तिकडे वळाले.  सुरुवातीला अनाबेशाही वान होता.  निफाड तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेत मग मंडप ,वाय पद्धतीच्या बागा उभारण्यात सुरुवात केली.

सुरुवातीला अनाबेशाही वाणाच्या काड्या उपलब्ध करून लागवडी केल्या होत्या.बाजारपेठांची मागणी ओळखून टप्प्याटप्प्याने वानामध्ये बदल झाले सुमारे 40 वर्षांपूर्वी अवघ्या दहा ते पंधरा एकरावर द्राक्ष लागवड होती.  आज गावचे एकूण 796 हेक्टर   क्षेत्रफळापैकी द्राक्षाखालील क्षेत्र सुमारे ३९७ हेक्टर आहे. यात शेतकऱ्यांची प्रयोगशीलता महत्त्वपूर्ण राहिली आहे.थॉम्पसन, सुधाकर, एसएसएन, सोनाका, क्लोन, शरद सीडलेस, मामा जम्बो. नानासाहेब पर्पल या वाणांच्या विविधतेसह किंगबेरी, क्रीमसन, आरा आदी नव्या वाणांनाही गावकऱ्यांनी पसंती दिली आहे.

निर्यातक्षम उत्पादन

रासायनिक अवशेषमुक्त अनुषंगाने राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चाचण्या सुरू आहे . स्वयंचलित हवामान केंद्र उभारून शेतकऱ्यांना बागेची काटेकोर व्यवस्थापन करता येत आहे.  एकरी दहा ते बारा  टन  उत्पादन शेतकरी येतात एकूण उत्पादनाच्या 80 ते 90 टक्के मालाची निर्यात होते . द्राक्ष शेती नैसर्गिक आपत्ती दरातील चढ-उतार या बाबींमुळे अस्थिर झाली आहे.मात्र व्यवस्थापन उत्पादन खर्च या बाबी संतुलित ठेवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो.

कायम शिकण्याची वृत्ती

गावात सध्या द्राक्ष उत्पादकांची तिसरी पिढी कार्यरत असून बदलत्या काळात आव्हानांवर मात करून नवे तंत्रज्ञान उगत करण्यासाठी सज्ज आहे.  चर्चासत्रे परिसंवाद महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अधिवेशन आधी ठिकाणी भेट देऊन येथील शेतकरी सतत शिकत असतात . गावात रस्त्याची अडचण आहे,शासनाने पक्के रस्ते व सामूहिक सुविधा उभाराव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

बाजार पेठेत मिळवलेले नाव

युरोपियन देशासह रशिया , बांगलादेश येथे गावातील द्राक्षांची निर्यात होते.  आयतदार देशातील सुपर मार्केटचे प्रतिनिधी गावात येऊन बागांची पाहणी करतात.  नाशिक जिल्ह्यातील निर्यातदार बांधावर येऊन खरेदी करतात.  परिसरातील शीतगृहांमध्ये माल  साठवण्याची सुविधा असते . देशांतर्गत म्हणाल तर मध्य प्रदेश, गुजरात. उत्तर प्रदेश, राजस्थानापर्यंत इथल्या द्राक्षांनी नाव मिळवले आहे.

प्रगती झाली सधनता आली.

कारसूळ मधील बहुसंख्य शेतकऱ्यांची जमीन धारणा एक ते पाच एकर दरम्यान आहे.  आता हे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले आहेत . सामाजिक आर्थिक समृद्धी अनुभवत आहेत.  प्रत्येकाचे घर आहे.  वाहन, ट्रॅक्टर, अवजारे आहेत . द्राक्ष हंगामात संपूर्ण गाव गजबजलेले असते. गावातील कृषी सेवा केंद्र ,छोटे हॉटेल, व्यवसायिक ,किराणा दुकानदार यांनाही व्यवसायिक संधी मिळते . हंगामात  तीन हजारांहून अधिक मजुरांना गाव रोजगार देत आहे.

पूरक व्यवसायांना चालना

गावात ११ महिला  बचत गटाची उभारणी झाली असून शेवया, कुरडई,पापड्या गिरणी आदी उद्योगांना चालना मिळाली आहे.  शंभरहून अधिक कुटुंबे दुग्ध व्यवसाय करतात.  गावातून दररोज दोन हजार लिटर दूध उत्पादन होते.  पाच संकलन केंद्र आहेत . गुजरात राज्यातील दूध संघांना दुधाचा पुरवठा होतो. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *