मळणीसाठी एकरी इतके रुपये दर हार्वेस्टरचालक घेत आहेत.जाणून घ्या सविस्तर ..

उन्हाच्या झळा आता तीव्र होत आहे ,रब्बी हंगामामधील गहू पिके काढणीसाठी आली आहेत. जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये सध्या गहू मळणीला वेग आला आहे. हार्वेस्टरला अनेक शेतकरी गहू मळणीसाठी मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत.एकरी ३००० ते ३५०० रुपये दर हार्वेस्टरचालक मळणीसाठी घेत आहेत.

सरासरीच्या ३९ हजार ८०३ हेक्टरपैकी जिल्ह्यामध्ये ३६ हजार ४०० हेक्टर म्हणजेच ९१ % गव्हाची पेरणी झाली आहे. यामध्ये दौंड तालुक्यामध्ये सर्वात जास्त सुमारे सहा हजार ४३९ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे.

त्या मागोमाग बारामती, जुन्नर,इंदापूर ,शिरूर या तालुक्यामध्ये गव्हाच्या चांगल्या पेरण्या झाल्या आहेत . वेल्हे, भोर, पुरंदर,हवेली, मुळशी, मावळ, तालुक्यात गव्हाच्या पेरण्या कमी झाल्या आहेत. मात्र गेल्या महिन्यापासून उन्हाचा चटका वाढत चालला आहे. रब्बी हंगामामधील पिके काढणी साठी येऊ लागली आहे.

पंजाब, हरियाना भागातून गेल्या १५ ते २० दिवसांपासून हार्वेस्टरचालक राज्यामध्ये आले आहेत.मोठ्या हार्वेस्टरने गहू कापणी करणे ,गोळा करणे व नंतर लहान हार्वेस्टरने मळणी करणे असे चित्र दिसत आहे . हार्वेस्टरमुळे वेळ व खर्च वाचत आहे. शिवाय, पैसेही कमी लागत आहेत. तीन ते चार एकरांतील गव्हाची मळणी एका तासामध्य व्यवस्थितपणे होत आहे.

मजुरांच्या तुलनेमध्ये हार्वेस्टर फायदेशीर..

सध्या शेती कामासाठी मजूरमिळत नाहीत. त्यामध्ये मोठ्या हार्वेस्टरच्या तुलनेत जास्त चा खर्चही येत आहे. एकरी अडीच हजार ते २८०० रुपये खर्च मजुरांकडून गहू कापणी, गोळा करणी साठी येतो असतो . ट्रॅक्टरचलित यंत्रणेला प्रतिक्विंटल ३०० रुपये खर्च गहू मळणीसाठी लागत असतो . त्यामुळे हरियाना, पंजाबमधील हार्वेस्टरला गहू मळणीसाठी मागणी असते . विविध भागातील पेट्रोल पंप, ढाबे, शेतांमध्ये ही मंडळी मुक्कामासाठी राहत असतात .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *