पोल्ट्री व्यावसायिकांसाठी समस्यांचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर हेल्पलाइन यंत्रणा उपलब्ध ..

जिल्हास्तरावर शेती पूरक व्यवसाय करणाऱ्या कुक्कुटपालकांच्या समस्यांचे निवारण होत नव्हते.  अशी कोणतीच यंत्रणा अस्तित्वात नव्हती.अशा प्रकारची यंत्रणा जिल्हास्तरावर असावी ,याकरिता कुक्‍कुट व्यवसायांनी पाठपुरावा केला होता.  त्याचीच दखल घेत 1962 तसेच १८००२३३३०४१८ असे दोन टोल फ्री क्रमांक आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

राज्यात शेती पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय वाढीस लागला आहे.  तब्बल नऊ लाखापेक्षा शेतकरी या व्यवसायात आहेत.  यातील काहींना वैयक्तिक स्तरावर भांडवल उभे करणे शक्य होत नाही.  त्यामुळे त्यांच्याकडून करारावर हा व्यवसाय केला जातो.  अशा शेतकऱ्यांना या क्षेत्रातील कंपन्या एक दिवसाच्या पिल्लांसह औषधी, खाद्य इतर बाबींचा पुरवठा करतात.

यामध्ये केवळ संबंधित शेतकऱ्यांकडे पोल्ट्री शेड असण्याची एकमेव अट आहे, परंतु गेल्या काही वर्षात करारदार कंपन्यांकडून एकतर्फी करार करून शेतकऱ्यांचे शोषण होत असल्याचे आरोप वाढीस लागले आहेत.  अशाच प्रकारे तक्रारीच्या निवारणासाठी त्यातूनच जिल्हास्तरावर हेल्पलाइनचा मुद्दा उपस्थित झाला.

समितीच्या बैठकीतही यावर वारंवार मंथन झाले त्याची दखल घेत आता जिल्हास्तरावर अशा तक्रारींच्या सोडवणुकीसाठी  पशुसंवर्धन विभागाकडून हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत . यामध्ये १९६२ तसेच १८००२४४०४१८  यांच्या दोन क्रमांकाचा समावेश असून यावर शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर हेमंत वसेकर यांनी केले.

करारावरील पोल्ट्री व्यवसायिकांचे अनेक प्रश्न आहेत त्यांच्या सोडवणुकीसाठी हेल्पलाइन असावी अशी मागणी होती.  याचीच दखल घेत प्रश्न संवर्धन आयुक्तांनी तसे लेखी निर्देशच जारी केले आहेत . छोट्या पोल्ट्री व्यवसायिकांना त्यांचे प्रश्न मांडण्यास याचा उपयोग होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *