kanda bajarbhav : अवकाळीमुळे मार्केट दबावात; सोलापूर, पुण्यात कसा मिळतोय कांदा बाजारभाव..

Kanda bajarbhav : अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या बातम्यांमुळे कांदा शेतकरी दबावात आले असून माल खराब होण्याच्या भीतीने अनेक शेतकरी आपला कांदा बाजारात विकताना दिसत आहे. परिणामी सोमवारी राज्यात कांद्याची आवक ४ लाख, मंगळवारी ३ लाख, बुधवारी अडीच लाख क्विंटलवर पोहोचली. त्यामुळे या आठड्यात लासलगाव आणि पिंपळगाव बाजारातील भाव हे दररोज सरासरी ५० रुपयांनी घसरून आज ११०० पर्यंत आले आहेत.

आज दिनांक 8 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये सकाळच्या उन्हाळी आणि लाल कांद्याची एकूण आवक मोठ्या प्रमाणात झाली. राज्यभरात सकाळच्या सत्रात उन्हाळी कांद्याची सुमारे 98 हजार क्विंटल आणि लाल कांद्याची सुमारे 23 हजार क्विंटल एवढी आवक नोंदवली गेली. याच दिवशी उन्हाळी कांद्याला राज्यात सरासरी 1050 रुपयांचा दर मिळाला, तर लाल कांद्याला सरासरी 950 रुपयांचा दर मिळाला.

राज्यातील सर्वाधिक उन्हाळी कांद्याची आवक पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सकाळच्या लिलाव सत्रात झाली. येथे एकूण 21 हजार 250 क्विंटल कांदा दाखल झाला. तर सर्वाधिक सरासरी दर रामटेक बाजार समितीत नोंदला गेला, जिथे उन्हाळी कांद्याला सरासरी 1400 रुपयांचा भाव मिळाला.

महत्वाच्या बाजार समित्यांतील दर तपासल्यास, लासलगावमध्ये उन्हाळी कांद्याचा सरासरी दर 1100 रुपये पिंपळगाव बसवंतमध्ये उन्हाळी कांद्याला 1150 रुपये बाजारभाव प्रति क्विंटल मिळाला.

पुणे बाजारात उन्हाळी कांद्याला सरासरी 950 रुपये आणि लाल कांद्यालाही 950 रुपयाचा दर मिळाला. सोलापूरमध्ये लाल कांद्याला सरासरी 700 रुपयांचा दर मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याची एकूण आवक 6810 क्विंटल इतकी असून सरासरी दर 500 रुपयांवर आला. नागपूरमध्ये लाल कांद्याला सरासरी 1100 तर पांढऱ्या कांद्याला 1050 रुपया दर मिळाला.

सांगली बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 900 रुपयांचा दर मिळाला. कोल्हापूरमध्ये मात्र केवळ एकूण आवक नमूद आहे, दराचा तपशील नसल्याने तुलना करता येत नाही. अहिल्यानगरचेही तपशील या नोंदीतून मिळालेले नाहीत.

सध्या उन्हाळी कांद्याची आवक वाढत असून दरावर त्याचा परिणाम जाणवत आहे. काही बाजार समित्यांमध्ये 1300 ते 1400 रुपयांपर्यंत दर मिळत असले तरी बहुतांश ठिकाणी दर 900 ते 1100 रुपयांच्या दरम्यान आहेत.