पावसाळ्यात कापसाची काळजी कशी घ्यायची? जाणून घ्या कापूस पिकाबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन …

पावसाळ्यात कापसाची काळजी कशी घ्यायची जाणून घ्या कापूस पिकाबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन ...

गेल्या पंधरवड्यात राज्यभरात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे.  कापूस पिकासाठी पाऊस आवश्यक असला तरी काही भागात जास्तीचा पाऊस झाल्याने कापूस पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असते. अशावेळी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.  पावसाळ्यामध्ये कापसाची नेमकी काळजी कशी घ्यावी याबाबत तज्ज्ञांनी  काय सांगितले ते जाणून घेऊया

पावसाळ्यात कापसाची काळजी कशी घ्यायची?

सलग पाऊस सुरू असल्याने शेतीमध्ये मशागत करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत  नाही त्यामुळे  शेतात मोठ्या प्रमाणात तण वाढले असून या तणाचं नियत्रंण करण्यासाठी शेतकऱ्यांनी मजुरांकडून किंवा तणनाशकाचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शन खाली उपयोग करणे गरजेचे आहे.  शेतामध्ये सध्या कापूस पिकात पाणी साठवून राहिल्याने कापूस पिकाची वाढ थांबून हे पीक खराब होण्याची शक्यता असते.  शेतकऱ्यांनी तातडीने शेतात साठून असलेले पाणी चर काढून शेताबाहेर काढणे गरजेचे आहे. 

पिकाबाबत कापूस तज्ञांचे मार्गदर्शन जाणून घ्या ?

सततच्या ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकावर मावा, तुडतुडे, फुल किडे ,यासह विविध कीड रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे . शेतकऱ्यांनी तातडीने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरून त्यावर नियंत्रण मिळवले पाहिजे. त्यासाठी योग्य प्रमाणात निंबोळी अर्कासह विविध कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरणे गरजेचे आहे. 

कामगंध सापळे वापरण्याचा सल्ला

यामध्ये निळे ,पिवळे चिकट सापळे वापरणे गरजेचे आहे .जेणेकरून कीड नियंत्रण करणे सोपे होईल . तसेच कापूस फुलाच्या अवस्थेत असेल तर कामगंध सापळे वापरले तर गुलाबी बोंड अळी नियंत्रण करता येते . यामुळे कामगंध सापळे वापरण्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. 

खत व्यवस्थापन आवश्यक

खत व्यवस्थापन करताना एक बॅग, 10 26 ,अर्धी बॅग युरिया, पाच किलो झिंक सल्फेट, दोन किलो  बॉर्यक्स, पाच किलो फेरस सल्फेट, पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट याचा बेसल डोस देणे गरजेचे आहे.  वेळेत योग्य प्रमाणात खत व्यवस्थापन केले तर कापूस उत्पादनात वाढ होत असल्याचे दिसून येईल.  शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात असा सल्ला कापूस तज्ज्ञांनी दिला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *