प्रतवारीनुसार नाही तर , सरसकट आले खरेदी करण्याचा निर्णय लागू..

कोणत्याही परिस्थितीमध्ये दि.१९ जुलै पासून आल्याचे सौदे सरसकट केले जाणार आहेत. व्यापाऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी कोणतेही कारण देऊन आल्याचे प्रतवारीनुसार वेगवेगळे सौदे घेऊ नयेत.असे प्रकार आढळले तर , होणाऱ्या परिणामासाठी सर्वस्वी ते जबाबदार राहणार आहेत , असा इशारा ,कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे , शेतकरी प्रतिनिधी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे,सातारा जिल्हा आले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेशशेठ जाधव,यांनी संयुक्तपणे दिला आहे.

बाजार समितीच्या गीताई मंगल कार्यालयात कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पत्रकाराने मागील पंधरवड्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये १८ जुलैपर्यंत प्रतवारीनुसार आले खरेदी विक्रीस काही अंशी परवानगी दिली होती.

जे शेतकरी अडचणीमध्ये आहेत, ज्यांची पिके अडचणी आहेत, त्यांच्यासाठी मदतीचा हात म्हणून ही भूमिका घेतली होती . परंतु , आता राज्य सरकारने सरसकट आले खरेदी विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे . त्यासाठी रितसर आदेश काढला आहे व शेतकरी आणि आले व्यापारीदेखील त्या निर्णयाशी सहमत आहेत.

सरसकट आले खरेदी विक्री १९ जुलैपासून करण्यात येणार आहे . कोणी जाणीवपूर्वक अथवा लपून-छपून प्रतवारीनुसार आले खरेदी विक्रीचा प्रकार आढळ्यास शेतकरी व व्यापारी असोसिएशन , विविध शेतकरी संघटना, कारवाई करणार आहेत. त्यातून होणाऱ्या परिणामास प्रतवारीनुसार खरेदी विक्री करणारे जबाबदार राहणार आहेत , असा इशारा दिनेश बर्गे व अमरसिंह बर्गे. सुरेशशेठ जाधव यांनी दिला आहे.

संयुक्त बैठकीत झालेल्या निर्णयाशी आणि राज्य सरकारच्या निर्णयाशी कोरेगाव बाजार समितीचे सभापती पांडुरंग भोसले, त्यांचे संचालक मंडळ व सचिव संताजी यादव हे देखील सहमत आहे. असे तिघांनी स्पष्ट सांगितले .

तर गनिमी काव्याने कारवाई… 

कोणतेही कारणे देऊन वेगवेगळे सौदे आले व्यापाऱ्यांनी करू नयेत. तात्पुरता विचार आले उत्पादक शेतकऱ्यांनीही न करता वेगवेगळा माल देऊन भविष्याचे नुकसान करून नये . शेतकऱ्यांचे नुकसान करण्याच्या उद्देशाने किंवा आंदोलन मोडीत काढण्याच्या उद्देशाने कोणत्याही व्यापाऱ्याने जर सरसकट आले खरेदी केले नाही तर गनिमी काव्याने कारवाई करण्यात येईल आणि त्यामधून होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यासह संबंधित व्यापारी जबाबदार राहणार आहेत , असा इशारा दिनेश बर्गे व अमरसिंह बर्गे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *