सोयाबीन ला भाव कमी आहे का ? तर मिळवा त्यावरती शेतमाल तारण अंतर्गत कर्ज..

सोयाबीनची प्रत काही ठिकाणी खालावली आहे तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची नासाडी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी मालाची जास्त आवक झाल्यामुळे शेत मालाचे भाव व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक पाडले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तारण योजनेंतर्गत कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई करू नये , असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. काही दिवस थांबल्यावर शेतकऱ्यांना जादा भाव मिळेल असा अंदाज व्यक्त होत आहे.

शेतमालास जादा भाव मिळू शकतो! मालाची मोठ्या प्रमाणावर आवक बाजार समितीमध्ये झाल्यानंतर दरामध्ये घट होते , हा शेतमाल साठवणूक करून काही काळ राहत असल्याने नंतर भाव मिळतो .

खुल्या बाजारातच होते सोयाबीनची विक्री

• ११ कृषी उत्पन्न बाजार समित्या बुलढाणा जिल्ह्यात आहेत. त्या बरोबर उपबाजार समित्या सुद्धा आहेत. या ठिकाणी सर्वाधिक शेतमालाची खरेदी करण्यात येते.

.• खरीप व रब्बी हंगामातील पीक खरेदीसाठी हमीभाव केंद्र शासनातर्फे जिल्ह्यात दरवर्षी सुरू केले जातात. त्यामुळे अनेक शेतकरी याच हंगामात शेतमाल विकतात.

• खुल्या बाजारातच रब्बी हंगामातील कडधान्य पिकाची विक्रीसुद्धा शेतकरी करीत असल्याने कृउबास मध्ये माल विक्रीसाठी नेला जात नाही.

शेतमाल तारण योजने मध्ये ६ टक्के व्याज दराने तारण कर्ज ६ महिने कालावधीसाठी दिले जाते. ६ महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना तीन टक्के व्याजाची सवलत मिळते.

काय आहे शेतमाल तारण योजना?

शेतमाल तारण कर्ज योजना कृषी पणन मंडळ १९९०-९१ पासून राबवीत आहे. बाजार समितीच्या गोदामात सदर योजनेंतर्गत तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्केपर्यंत रक्कम ६ महिने कालावधीसाठी ६ टक्के व्याज दराने तारण कर्ज म्हणून दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *