रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा जास्त वापर केल्यामुळे जमिनीची प्रतिकारक शक्ती कमी होते . त्यामुळे जमीन ही नापीक होते. यामुळे शेतकऱ्यांचा सेंद्रिय खताकडे जास्त कल वाढलेला आहे बेगुसराय मुनीलाल हे जैविक पद्धतीने शेती करणारे शेतकरी आहेत .
ते योग्य दरात शेणा पासून तयार झालेल्या खतांची शेतकऱ्यांना विक्री करतात. तसेच शेतकरी त्यांना ऍडव्हान्स देऊन देखील शेणखत विकत घेत असतात . त्यांना जैविक मॅन या नावाने संबोधले जाते . तसेच ते जैविक पद्धतीने शेती करण्याचे प्रशिक्षण देखील देतात आतापर्यंत त्यांनी हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे. मुनीलाल हे स्वतः जैविक पद्धतीने शेती करत आहेत २०१३ पासून ते या प्रकारची शेती करत आहेत . त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे.
जैविक शेतीतील उत्पन्नाला चांगला भाव
मुनीलाल मेहता यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक शेतकऱ्यांनी जैविक पद्धतीने शेती करणे सुरू केली आहे . इतर शेतकऱ्यांच्या मते देखील जैविक पद्धतीने शेती केली की त्या मालाला चांगला भाव मिळत आहे.
चाळीस रुपये किलो रासायनिक खत
रासायनिक खते 40 रुपये किलोने मिळतात परंतु जैविक खत सहा रुपये किलोने मिळते . रासायनिक खतांचा वापर केला तर सहा वेळा पिकाला पाणी द्यावे लागते तसेच जैविक पद्धतीने शेती केली तर त्या पिकाला तीनच वेळा पाणी देण्याची गरज असते.
जैविक खतामधून वार्षिक उत्पन्न
या शेतकऱ्यांकडे या दोन गायी आहेत या गाईच्या शेणा पासूनच ते जैविक खत तयार करत असतात ते त्यांच्या दोन एकर जमिनीमध्ये जैविक खताचा वापर करतात उर्वरित खत ते इतर शेतकऱ्यांना विकून टाकतात त्यातून त्यांना दरवर्षाला साठ हजार रुपये मिळत असतात ते कीटकनाशक म्हणून गोमूत्र चा वापर करत असतात त्यामुळे पिकांचे नुकसान देखील होत नाही.