कांदा खरेदी सुरू असताना नाफेड मार्फत कांदा खरेदी बाबत होल्डिंग लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. यावर कांदा खरेदी बाबत अनेक अटी शेतकऱ्यांवर लावण्यात आल्या आहेत. यामध्ये वास येत असलेला, विळा लागलेला ,काजळी बसलेला, कांदा स्वीकारला जाणार नाही अशा अटी घालण्यात आलेल्या आहेत. तरी या जुन्याच अटी असून यामध्ये नवीन अटी घालण्यात आल्या नसल्याचे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले.
बाजार समितीवर तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी असे आदेश जरी काढले असले तरी मात्र अद्यापही ही खरेदी सुरू झालेली नसल्याचे आरोप शेतकरी करत आहेत. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये मालाला भाव कमी अजूनही खरेदी सुरू केलेली नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त प्रक्रिया व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे नाफेडने कांदा खरेदीसाठी लावलेल्या नियम व अटी बघता शेतकऱ्यांचा कांदा नाफेड केंद्रावर विक्री होणार ,तरी कसा असे प्रश्न उपस्थित राहिले आहेत . बाजार समितीच्या परिसरामध्ये नाफेडच्या खरेदी बाबतचे होल्डिंग लावण्यात आले असून त्यावर जाचक नियम व अटी देण्यात आलेल्या आहेत.
नाफेडच्या होल्डिंग वर दिलेल्या नियम व अटी
नाफेड मार्फत कांदा खरेदीला सुरुवात झाली असून नाशिकच्या पिंपळगाव बाजार समिती परिसरात खरेदी केंद्र सुरू आहेत या खरेदी केंद्राबाहेर नाफेड मार्फत होल्डिंग लावण्यात आलेले आहेत . यामध्ये शेतकरी बांधवांसाठी काही नियम व सूचना दिल्या आहेत. यामध्ये प्रती हेक्टर 280 क्विंटल पेक्षा जास्त कांदा स्वीकारला जाणार नाही. दर्जेदार 45 मिमीच्या पुढचा कांदा चालेल असे सुचित करण्यात आले आहे. तसेच अशा प्रकारचा कांदा स्वीकारला जाणार नाही . ज्या कांद्यामध्ये विळा लागलेला, पत्ती निघालेला ,काजळी असलेला रंग गेलेला, उन्हामुळे चट्टे पडलेला, कोंब फुटलेला, आकार बिघडलेला ,गरम मऊ असलेला ,वास येत असलेला, बुरशीजन्य, मुक्त बेले ,असलेला कांदा स्वीकारला जाणार नसल्याचे स्पष्टपणे लिहिलेले आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले:
अटी ज्या पूर्वी होत्या त्याच आजही आहेत. बाकी काही नव्याने घेतलेले नाही . ज्यावेळी कांद्याचे भाव पडले त्यावेळी नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यात आला त्यावेळी देखील अशा अटी लावण्यात आल्या होत्या . त्याच धर्तीवर आत्ताही खरेदी करण्यात येत आहे . वेगळी अशी अट नसल्याचे मुंडे यांनी सांगितले. केंद्र सरकारने 2410 क्विंटल ने कांदा खरेदीचा निर्णय घेतला. दोन लाख टन कांद्याची खरेदी या ठिकाणी चालू झालेली आहे.
मात्र शेतकऱ्यांची म्हणणे आहे. की नाफेड किंवा एनसीसीएफ चे कांदा खरेदी केंद्रावर जाऊन कांदा विक्री करण्यापेक्षा नाफेड एनसीसी ने कांदा बाजारात यावे आणि कांदा खरेदी करावी. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रामुख्याने प्रश्न अजून या संदर्भात स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना देखील आदेश देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांच्या समाधान होईन असे मार्ग काढण्यात येईल असेही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.