सध्या बाजारामध्ये मागील चार दिवसांमध्ये कापूस दरात क्विंटल मागे तीनशे रुपयांची सुधारणा झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच देशातही कापसाची भाव चांगलेच वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे सांगितले जात आहे . देशातील बाजारात दीड महिन्यानंतर कापूस दराने 7500 रुपयांचा टप्पा पार केला तर दीड महिन्यानंतर वायद्यांमध्ये कापूस 59000 च्या पुढे गेला
चीन मधून कापूस खरेदी वाढली आहे. सुतालाही मागणी वाढत आहे. या कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्याने देशातील बाजाराला आधार मिळाल्याचे सांगितले जात आहे. सुताचे भाव अनेक बाजारामध्ये किलोमागे चार ते पाच रुपयांनी वाढले आहेत. यामुळे कापसालाही उठाव येत आहे. देशातही सणामुळे कापसाला उठाव वाढत आहे.
फळभाज्या पालेभाज्या भावात देखील 10 ते 30 टक्के पर्यंत वाढ झाली आहे. यामुळे बाजारात टोमॅटो ,घेवडा,हिरवी, मिरची, वांगी ,मटार राजमान या फळभाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. तसेच मागच्या काही दिवसापासून सततच्या पावसामुळे धान्य, फळभाज्या आणि पालेभाज्यांचेही नुकसान झाले आहे. परिणामी पावसामुळे रोजच्या तुलनेत बाजारात आवक घटली आहे. बाजारात मागणी अधिक आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला चांगला दर
बाजारातील भाजीपाल्यांचे दर हे गगनाला भिडलेले आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगलाच भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे . कित्येक शेतकरी तर टोमॅटोमुळे मालामाल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाला असाच दर जर मिळाला तर शेतकरी कर्जबाजारी होणार नाहीत आणि आत्महत्या देखील करणार नाहीत.
टोमॅटोमुळे शेतकरी झाला करोडपती; आजून पण कोटीचे टोमॅटो शिल्लक,
तेलंगणा मधील मेडक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने टोमॅटोचे पीक घेतले व नेमकेच दर वाढले यामुळे हा शेतकरी चांगलाच मालामाल झाला आहे, बी महिपाल रेड्डी असे या शेतकऱ्याचे नाव आहे, हा शेतकरी
त्यांच्या 20 एकर शेत जमिनीवर भात शेती करायचे पण त्यानंतर त्याने टोमॅटोची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे जणू त्यांच्या आयुष्यातलाच कलाटणी मिळाली आहे.
शेतामध्ये टोमॅटोचे आणखीन पीक शिल्लक आहे . परंतु या संततधार पावसामुळे पिकाचे नुकसान होणार असल्याने त्यांना पिकाची काळजी वाटत आहे. रेड्डी यांनी स्वतःची वीस एकर जमीन सोडून त्यांनी 80 एकर भाडेतत्त्वावर जमीन घेतली असून 60 एकरामध्ये भात शेती केली आहे. आणि उर्वरित जमिनीवर ते इतर पिके घेत असतात.