मुंबईसह राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे मुंबईमध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे . आजही मुंबई, गडचिरोली ,यवतमाळ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील काही शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. ठाण्याला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून आणखीन दोन दिवस असाच पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये पावसाचा वाढता जोर पाहून हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. ठाण्यामध्ये पावसाचा वाढता जोर पाहून शाळेला व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे . तसेच पालघर जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. यापूर्वी आठवड्याभरापासून पाऊस खूप मोठ्या प्रमाणात बरसत होता. धरण क्षेत्रामध्ये सुद्धा पाण्याचा साठा खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
राज्यामध्ये सर्वच भागांमध्ये आज अतिवृष्टी होणार आहे. 29 ते 31 जुलै पर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तसेच महाराष्ट्र किनारपट्टीला सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. गेल्या आठ दिवसापासून राज्यातील अनेक भागांमध्ये सूर्यदर्शन झालेले नाही. सर्वत्र चांगला पाऊस सुरू आहे.
28 रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा अंदाज देण्यात आलेला आहे. 29 जुलैपासून सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस राहील. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे . बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू आहे.
कोकण घाटमाथा विदर्भात जोरदार पावसाचा इशारा
कोकण घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याचा घाटमाथा विदर्भातील भंडारा ,गोंदियामध्ये जोरदार पाऊस विभागाने वर्तवलेला आहे.
मान्सूनचा आज असलेल्या कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, रायसेन, दुर्ग, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व मध्यम बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेला मान्सूनचा आस उत्तरेकडे जाण्याची संकेत आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून असलेले पूर्व पश्चिम वाऱ्याचे जोडक्षेत्र समुद्रसपाटीपासून 4.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे.
कोकणघाट माथ्या सह विदर्भात जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. धरणाच्या पायलट क्षेत्रातही संततधार सुरू आहे. आहे रायगड ,रत्नागिरीसह, पुणे, सातारा जिल्ह्याचा घाटमाथा विदर्भातील भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे . उर्वरित विदर्भ कोकण ,कोल्हापूर, जिल्ह्यात विधानसह जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.