Milk Rate : उन्हाळ्यामध्ये दुग्धजन्य पदार्थाच्या वाढत्या मागणीमुळे दुधाच्या दरामध्ये वाढ….

दुधाच्या किमती घसरल्यामुळे तसेच उन्हामुळे संकलनामध्ये १५-२० टक्क्यांनी घट झाली. अशातच लग्नसराई तसेच उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्यामुळे खरेदीच्या दरात हळूहळू वाढ होत आहे. एप्रिल महिन्यामध्ये २६ रुपयांचा दर २७ रुपये झाला होता आता तो दर १ मेपासून २८ रुपये होणार आहे.

जागतिक पातळीवर बटरला व पावडरला म्हणावी तशी ग्राहकांची मागणी नाही. त्यामुळे मागील वर्षभरात बटर व पावडरीच्या दरात सुधारणा झाली नाही. त्यामुळे दूध खरेदी दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे . काही महिन्यापूर्वी ३९ रुपयांवर गेलेला गाय दूध खरेदी दर २६ रुपयांवर आला होता.

पाच रुपये अनुदान शासनाने गाय दुधाला जाहीर केले होते . परंतु त्याचा परिणाम दूध खरेदीवर झाला नाही ,त्यामुळे शेतकऱ्याने आपल्याकडील बरीचशी दुभती जनावरे विकली . याशिवाय दुधाला भाव कमी असल्यामुळे शेतकरी पशुखाद्य व हिरवा चारा पुरेसा तेवढा घालत नाहीत. याचा देखील परिणाम दुधावर झाला आहे.

दुधाला उन्हाचा देखील फटका बसल्याने १५ ते २० टक्क्यांपर्यंत संकलनामध्ये घट झाली . दुग्धजन्य पदार्थांची मागणी उन्हाळ्यात वाढली आहे. यामुळे दूध खरेदीदरामध्ये वाढ होत आहे.

१ मेपासून दूध दारात वाढ

गाय दूध खरेदी दर गेल्या वर्षभरात प्रतिलिटर २६ रुपयांवर आलेला दर याच महिन्यामध्ये एक रुपयाने वाढ होऊन २७ रुपये झाला आहे. १ मेपासून आणखी एक रुपयाची दूध दरात वाढ होऊन शेतकऱ्यांना आता २८ रुपये मिळणार आहेत.

१५ ते २० टक्क्यांपर्यंत दूध संकलनामध्ये घट झाली आहे परंतु त्या प्रमाणामध्ये दुधाच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली नाही . बटरच्या आणि पावडरच्या दरात वाढ झालेली नसल्या मुळे म्हणावी तशी दूध खरेदीदरात वाढ करता येत नाही. अशातही दूध खरेदीदरात वाढ होत आहे.

Leave a Reply