यंदाच्या रब्बी हंगामामध्ये काबुली हरभऱ्याची लागवड वाढण्याची शक्यता आहे . हरभऱ्याचे दर गेल्या वर्षी मागील काही महिन्यात आपण बघितलं तर फार कमी राहिले आहेत. त्यामुळे काबुली हरभरा लागवडीला प्राधान्य देण्याची शक्यता शेतकऱ्याची वाढली आहे .
काबुली हरभरा जेव्हापासून विक्रीला आला त्यापासून त्यांची सुरुवात 9302 झाली आहे. विचार केला तर हरभऱ्याला सरासरी पाच हजार रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे विकत आहे. दुसरीकडे काबुली हरभरा 14 हजार ते पंधरा हजार प्रतिक्विंटल विकला जात आहे. त्यामुळे यावर्षी काबुली हरभऱ्याची लागवड होण्याची शक्यता आहे, त्या बद्दलची माहिती आपण घेणार आहोत . काबुली हरभऱ्याची पेरणी शक्यतो ओलीताच्या क्षेत्रात तसेच दहा नोव्हेंबर पूर्वी करावी . शक्यतो सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. ओलावा कमी असल्यास प्रथम ओलित करावे. वाफसा आल्यानंतर पेरावे. पेरणी केल्यानंतर अंकुरण होईपर्यंत आपल्याला पाणी द्यायचे नाही. परंतु पाणी देण्या पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे आहे . त्यासाठी आपण जीवाणू संवर्धनाचा वापर करू शकतो . त्याचे खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. पेरणी नंतर सुमारे 45 ते 60 दिवस पिके तनमुक्त राहिले पाहिजे आणि आपले पिक फुलोरा अवस्थेत असताना पाणी देणे टाळावे. जेव्हा फुलरावस्थेत अवस्था बंद झाली असेल गाठे भरण्यास सुरुवात झाली तेव्हा पाणी द्यावे .
शेतकरी बांधवांनो आज आपण महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या काबुली हरभरा टॉप च्या जाती विषयी माहिती घेणार आहोत.
त्यामध्ये आपण सर्वात प्रथम बघू विराट या जाती विषयी माहिती.
विराट या काबुली हरभऱ्याची कालावधी हा 110 ते 115 दिवस असतो. या वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे अधिक टपोरे दाणे हे वाण मर रोगास प्रतिकारक असते. महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित करण्यात आलेले आहे. या वाणाच्या 100 दाण्यांचे वजन हे 35 ग्रॅम असते. या वाण्याची उत्पादन देखील हेक्टरी जर आपण हे जिरायत जमिनीमध्ये घेतले असेल तर दहा ते बारा क्विंटल आहे. जर आपण बागायती क्षेत्रामध्ये जर याचा उपयोग करत असेल तर तर 18 क्विंटल हेक्टरी एवढे असते.
नंबर दोनचा वन म्हणजे पिकेव्ही -२
या वाणाला पेरणी पासून काढणीपर्यंत 100 ते 105 दिवसाचा कालावधी लागतो. बाकीच्या वाणाच्या तुलनेत हा वान थोडा लवकर येतो. देखील या वाणाची वैशिष्ट्ये देखील अधिक टपोरे दाणे व मर रोगास प्रतिकारक आहे . हा वान लवकर परिपक्व होणार आहे . या बाणाच्या शंभर दाण्याची वजन देखील वजन हे 35 ते 40 ग्रॅम आहे. या वाणाचे हेक्टरी उत्पादन 10 ते 12 क्विंटल एवढे आहे.
या वाणाचा तिसरा म्हणजे पिकेव्ही – ४ .
या वानाचा कालावधी हा 100 ते 160 दिवसाचा आहे. या मानाचे दाणे देखील अधिक टपोरे आहेत हा वन मर रोगास मध्यम प्रतिकारक आहे या मानाच्या 100 दाण्यांची वजन हे 50 ते 53 ग्रॅम आहे हा वन विदर्भासाठी प्रसारित आहे ाचे उत्पादन हे हेक्टरी 16 ते 18 क्विंटल एवढे होते.
नंबर चारचे वाण म्हणजे कृपा
या वाणाचा कालावधी हा 105 ते 110 दिवसाचा आहे या वाणाचे जास्त टपोरे दाणे या वाणाच्या 100 दाण्यांचे वजन हे जवळपास 60 ग्रॅम आहे हा वाण मर रोगास प्रतिकारक्षक आहे . हा वाण महाराष्ट्र राज्य असेल, मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, या राज्यांमध्ये हे वाण प्रसारित झाले आहे. या वाणाचे उत्पादन हे जवळपास 16 ते 18 क्विंटल एवढे निघते. काबुली हरभऱ्याच्या या चार जाती आहेत.