कारल्याच्या शेतीने बदलले शेतकऱ्याचे नशीब, अवघ्या अडीच महिन्यात कमावला दीड लाखांचा नफा , वाचा सविस्तर …

शेतकरी त्यांच्या शेतात हंगामानुसार पिके घेण्यासाठी अत्यंत सावधगिरीने आणि नियोजनाने काम करतात. प्रत्येक हंगामात भाज्यांची मागणी कायम आहे. शेतकऱ्यांनीही ही मागणी लक्षात घेऊन भाजीपाल्याची लागवड सुरू केली असून, त्यातून चांगला नफाही मिळवत आहेत .

तर भाजीपाल्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी कारल्याची लागवड हा उत्तम पर्याय ठरला . कारल्यात औषधी गुणधर्म भरलेले असल्याने बाजारात त्याची मागणी कायम असते.  विवेक कुशवाह हे कारल्याची लागवड करून चांगला नफा कमवत आहेत.  

विवेक कुमार यांनी २० गुंठे (अर्धा एकर) शेतामध्ये एप्रिल महिन्यात कारले पिकाची लागवड केली. यासाठी त्यांना बी- बियाणे, औषधी, बांबू ठिबक यासाठी त्यांना २५ हजार रुपये खर्च आला. हा खर्च वजा करता त्यांना तीन महिन्यांत दीड लाख रुपयांचा कारल्याच्या उत्पादनावर नफा मिळाला . तीन महिन्यांत त्यांनी शंभर क्विंटल कारले विकले. मुंबई ,नाशिक, मालेगाव येथील व्यापाऱ्यांनी ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने विवेक कुमार यांच्याकडून हे कारले खरेदी केले. आणखी ६० हजारांचे उत्पादन होईल, असे विवेक कुमार यांनी सांगितले. भाजीपाल्यांचेही उत्पादन विवेक कुमा घेत आहेत. विशेष म्हणजे मुंबई ,नाशिक, मालेगाव, वाशीमचे व्यापारी स्वत: येऊन कारल्याचा माल खरेदी करतात, तर औरंगाबाद शहरात स्वत: कारल्याची ४० रुपये दराने विक्री करत असल्याचे विवेक कुमार यांनी सांगितले. 
– ४० ते ५० रुपये प्रतिकिलो मिळतोय कारल्याला दर 
– २० गुंठे अर्धा एकर शेतामध्ये घेतले कारल्याचे उत्पन्न 

कुटुंबीयांची साथ… 

 कारल्यासह सर्वभाजीपाल्यांचे  उत्पादन ते घेतात . कृषी अधिकाऱ्यांशी नेहमी संपर्क साधून हवामानाचा अंदाज घेऊन तीन महिन्यांत भरघोस कारल्याचे उत्पादन घेण्याची किमया साध्य करता आली. यासाठी भाऊ, पत्नी यांची मोठी साथ मिळाली.  

उत्पादनासाठी असा प्रयत्न ?

सुरुवातीला ट्रॅक्टरने सरी पाडून बाय फुटावर कारले बियाण्यांची लागवड केली. उगवल्यानंतर प्रत्येक सरीला शेणखताचा डोस दिला. बाबूंचे मंडप बांधून आतापर्यंत प्रत्येक १५ दिवसाला बायोस्टीन औषधाच्या तीन फवारण्या केल्या. ठिबकद्वारे दोन किलो मायक्रो न्युटन सूक्ष्म अन्नद्रव्य ह्युमिक एसिड १९१९ खताचे एक दिवसानंतर डोस देण्यात येतो, अशी विवेक कुमार  यांनी माहिती दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *