शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत कृषी सोलर पंप दिले जातात . ही योजना सर्व जिल्यांमध्ये राबवली जाते. 2022 मध्ये काही जिल्ह्यांमध्ये सोलार पंप चा कोटा शिल्लक न राहिल्यामुळे नवीन सोलर पंप अर्ज बंद झाले होते.
२०२३ मध्ये राज्यातील काही जिल्यांमध्ये सोलर पंप कोठा करून उपलब्ध दिल्यामुळे आपण शासनाच्या वेबसाईटला जाऊन आपण आपला जिल्हा निवडून , अर्ज भरून देऊ शकतो .व वेबसाईटवर जाऊन खालील कागदपत्रे सोबत आपण ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा.
कुसुम सोलर पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
8 अ उतारा
विहीर किंवा बोरची नोंद असलेला सातबारा
पासबुक किंवा कॅन्सल चेक
अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
सामायिक विहीर नोंद असेल तर खातेदाराचे ना हरकत २०० रुपये शपथपत्र .
वरील सर्व कागदपत्रे कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी गरजेचे आहे. ही कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून ऑनलाईन अपलोड करावी .
नवीन अर्ज करण्यासाठी कोठा शिल्लक असलेले जिल्हे खालील प्रमाणे …
1 .रत्नागिरी
2. अमरावती
3. अकोला
4. वर्धा
5. नागपूर
6. रायगड
7. पालघर
8. सातारा
9. गडचिरोली
10. कोल्हापूर
11 सांगली
12. चंद्रपूर
13. गोंदिया
14. पुणे
15. सिंधुदुर्ग
16. भंडारा
17. ठाणे