शेतीमालाच्या दरावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आवक होत असलेल्या सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याचे दर हे स्थिरावले होते. सोयाबीनच हंगाम अंतिम टप्प्यात आहे. असे असताना शेतकऱ्यांनी 7 हजार 300 हाच दर मान्य केला आहे. त्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढत आहे तर दुसरीकेडे हमीभावपेक्षा अधिकच्या दरावर गेलेली तूर दर मात्र झपाट्याने घसरत आहे. मध्यंतरी खुल्या बाजारपेठेत तुरीचे दर हे 6 हजार 500 वर गेले होते. मात्र, केंद्र सरकारने तूर आयातीच्या धोरणामध्ये बदल केल्याचा परिणाम थेट तुरीच्या दरावर झाल्याचे पाहवयास मिळत आहे. कारण 6 हजार 500 वर गेलेली तूर आता थेट 6 हजार 200 रुपये क्विंटल झाली आहे. त्यामुले तुरीचे उत्पादन घटूनही शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळालेला नाही.