ज्या शेतकऱ्यांनी सिंचन योजनेसाठी अर्ज केलेल्या त्यांची यादी नुकतीच जाहीर झालेली आहे . या योजनेमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे,कोणाला किती अनुदान मिळाले आहे ? ही माहिती कशी पहायची याविषयी सर्व माहिती या मध्ये दिली आहे.
प्रथम, nrega.nic.in नावाच्या वेबसाइटवर जा. त्यानंतर, तुमच्या ग्रामपंचायत या ऑप्शनवर क्लिक करा आणि “जनरेट रिपोर्ट” पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला कोणते राज्य, वर्ष, जिल्हा, तालुका आणि गावाची माहिती पहायची आहे ते निवडणे आवश्यक आहे.त्यानंतर proceed करा, तुम्ही हे केल्यानंतर, तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसेल जो तुमच्या गावात घडत असलेली कामे दर्शवेल.
त्यानंतर work status या ऑप्शनवर क्लिक करावे व आर्थिक वर्ष निवडा , हे निवडल्यानंतर कामाची यादी दिसेल या मधील वैयक्तिक काम यावर क्लिक करा ,त्यानंतर आपणांस चालू आर्थिक वर्षातील वैयक्तिक कामाची यादी पाहिला मिळेल . यामध्ये मनरेगा सिंचन योजनेअंतर्गत मागेल त्याला विहीर अनुदान मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादी दिसेल.
मध्यंतरी मनरेगा सिंचन योजनेअंतर्गत शिंदे – फडणवीस सरकारने नवीन घोषणा केली होती. मागेल त्याला विहरीसाठी चार लाखांचे अनुदान मिळणार होते त्यासाठी काही अटी व शर्थी असल्याचे नुकतेच पत्रक जाहीर केले होते.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा भाग व्हायचे आहे ज्यामुळे त्यांना मदत होईल. ही योजना अत्यंत महत्त्वाची असून शेतकऱ्यांसाठी चांगली असेल. त्यामुळे अनेक शेतकरी त्यात इच्छुक आहेत.