दुधातील फॅट कमी झाले आहेत का ? दुधातील फॅट वाढवण्यासाठी करा या उपाय योजना ..

महाराष्ट्रामध्ये म्हशीच्या दुधात किमान ६ फॅट ,तर गायीच्या दुधात फॅट ३.८ फॅट असणे आवश्यक असते. त्यापेक्षा फॅट कमी असेल तर ते दूध अप्रमाणित समजले जाते.फॅट वर दुधाची किंमत ठरविली जाते. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोवळा व हिरवा चारा उपलब्ध असतो. हिरवा चारा उपलब्ध असल्यामुळे दुधाळ जनावरांना खूप जास्त प्रमाणात हिरवा चारा खाऊ घातला जातो. हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण व तंतुमय घटक जास्त प्रमाणात असतात . त्यामुळे दुधातील फॅट कमी लागते.

दुधातील फॅट म्हणजे काय?

दुधात सॉलिड नॉट फॅट हा एक पोषक घटक आहे, तो दुधाची चरबी आणि पाण्याव्यतिरिक्त असतो. त्यामध्ये प्रथिने (प्रामुख्याने केसिन आणि लॅक्टलब्युमिन),खनिजे (कॅल्शियम आणि फॉस्फरससह) आणि कार्बोहायड्रेट्स (प्रामुख्याने लॅक्टोज) असतात.दुधाच्या चरबीसह जेव्हा ते एकत्र केले जाते, तेव्हा त्याला एकूण घनपदार्थ असे म्हणतात .

दुधात फॅट किती पाहिजे ?

गाय : गायीच्या दुधाला किमान ३.८ फॅट असते.
म्हैस : म्हशीच्या दुधात ६ फॅट असणे गरजेचे असते .

फॅट वाढीसाठी कोणता आहार महत्त्वाचा

१) हिरवा चारा : पावसाळ्यामध्ये जनावरांना आपण भरपूर प्रमाणात हिरवा चारा देतो ,हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त तर तंतुमय पदार्थ कमी असतात . त्यामुळे फॅट कमी लागते, त्यासाठी हिरव्या चाऱ्यांबरोबर वाळलेला चारा देणे सुद्धा गरजेचे असते.

२) वाळलेला चारा : जनावरांच्या आहारामध्ये एकूण तंतुमय घटकांचे प्रमाण म्हणजेच वैरणचे प्रमाण २८ ते ३१ टक्के असणे गरजेचे आहे. एकूण ६५ % इतके कडब्याचे प्रमाण दुधाळ जनावरांना आहारातून गेले पाहिजे.

आहाराचादेखील दुधाच्या फॅटवर परिणाम होतो. आपण जनावरांना कोवळा, हिरवा चारा देत असतो. हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त व तंतुमय पदार्थ कमी असतात . त्यामुळे दुधाला फॅट कमी लागते, त्यासाठी आपण नियमित पणे जनावरांना हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेला चारा देणे गरजेचे आहे.  – डॉ. व्यंकटराव घोरपडे, सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *