उन्हाळ्यात दूध आणि दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांना चांगलीच मागणी असते असे असतानाही दुधाच्या दरात कपात केली जात आहे.मागच्या वीस दिवसात गाईच्या दुधामध्ये चार रुपयांची घट झालेली आहे.गायीच्या दुधाची किंमत सहा महिन्यांपूर्वी 38 रुपये होती, मात्र आता ती स्वस्त होऊन 34 रुपये झाली आहे.
दुधाची पावडर आणि लोणीचे भावही घसरल्याने दुधाचे भाव कमी झाल्याचे सांगितले जात आहे.दूधसंकलन केंद्र चालकांच्या मते अजून दरात कपात होण्याची शक्यता आहे.यामुळे दूधउत्पादक खरोखरच चिंतेत आहेत . बटरच्या दरावर दूधव्यवसाय अवलंबून असतो . गेल्या ६-७ वर्षांपासून दूध व्यवसाय हा सातत्याने अस्थिर होत आहे.
कोरोना काळात दुध व दुधापासून बनणारे पदार्थ लोक जास्त विकत घेत नव्हते . त्यामुळे दुधाचा दर कमी झाला होता. पण कोरोना काळानंतर दुधाचे दर हळूहळू वाढले.
परंतु त्या अगोदर दूध दरामध्ये वाढ होण्यासाठी राज्यात दूधउत्पादकांना संप व आंदोलने करावे लागले होते. दूध उत्पादकांना सातत्याने अडचणीत आणले जात असल्याचा आरोप होत आहे.
राज्यामध्ये सत्तर सहकारी व तीनशे खासगी दूध संघ आहेत . त्यांच्याद्वारे २ ते सव्वादोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते. त्यामधील ४० % दुधाची पावडर,व इतर दुधाचे पदार्थ बनवले जातात. आणि ६०% दूध ग्राहकांना पिशव्या मधून विकले जाते. या वेतिरिक्त साधारणपणे २५ लाख लिटर दुध हे ग्राहकांना विकले जाते. यातील विकलेले दूध हे म्हशीचे असल्याचे सांगितले जात आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून दुधाचे दर वाढले यामुळे दूध उत्पादक काहीसे समाधानी होते,परंतु पुन्हा दरात मध्ये कपात केली त्यामुळे दूध उत्पादकांची चिंता वाढली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे…
१. दुधाला गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून 38 रुपये दर मिळाला होता .
२.त्यामुळे ७ ते १० % दूध उत्पादन वाढले.
३. मागील काही दिवसांपासून दर कपात सुरू .
४. दूध व दुधापासून तयार झालेल्या पदार्थांना मागणी वाढली असून देखील तसेच , उन्हामुळे दूध उत्पादनात १० % घट झाली आहे. तरीपण दर कमी झाले यामुळे दूधउत्पादक अधीक संकटात आहेत.
5. बटरच्या व पावडरच्या दरावर दूधव्यवसाय अवलंबून असतो . त्यांच्या आयातीची सरकारकडून चर्चा, यामुळे दूध पावडर व बटरसह दुधाचे दर कमी.