महाराष्ट्रातील‘मॉन्सून’चे आगमन काही तासांवर येऊन ठेपले आहे.मॉन्सून गोव्यात दाखल होत महाराष्ट्राच्या नजदिक आला आहे . कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील सोलापूर,कोल्हापूर, सांगली,धाराशिव , पुणे, सातारा, जिल्ह्यामध्ये आज (ता. ६) मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता आहे. तर विदर्भाचा काही भाग वगळता १० जूनपर्यंत बहुतांश महाराष्ट्रामध्ये मॉन्सूनची प्रगती होण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
बुधवारी (ता.४) पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गोंदिया, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ वगळता बहुतांश महाराष्ट्रामध्ये कमाल तापमान ४० अंशांच्या खाली घसरले आहे.
चक्राकार वाऱ्यांची स्थिती कर्नाटक किनारपट्टीलगत निर्माण झाली आहे. यातच पश्चिमेकडील वाऱ्यांचे प्रवाह बळकट होत आहेत , बाष्पाचा पुरवठा अरबी समुद्रावरून वाढला आहे. आज (ता. ६) कोकण, मध्य महाराष्ट्र, विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) ,मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, वाहतील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यामध्ये उन्हाचा चटका कमी होऊन,उकाडा कायम व ढगाळ हवामान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बुधवारी (ता. ५) राज्यामध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये
◼️ कोकण : कुडाळ, संगमेश्वर गुहागर, प्रत्येकी १०, मुलदे ४०, .
◼️ मध्य महाराष्ट्र : लोणावळा ८०, कसबे डिग्रज,कडेगाव प्रत्येकी ५०, इंदापूर, भडगाव प्रत्येकी ४०, पुणे शहर प्रत्येकी ७०, सांगली ६०, तासगाव, पलूस, जत, चिंचवड, मिरज, सोलापूर, सासवड, जेऊर प्रत्येकी २०.
◼️ मराठवाडा : निलंगा, परभणी ,उमरगा, सोयगाव, प्रत्येकी १०, गंगापूर २०,
◼️ विदर्भ : संग्रामपूर, अकोट प्रत्येकी २०, शेगाव, नंदूरा प्रत्येकी ३०, हिंगणघाट,जळगाव जामोद,चिखलदरा प्रत्येकी ४०, परतवाडा, आमगाव, नरखेड, बार्शीटाकळी, तेल्हारा, सेलू, मलकापूर प्रत्येकी १०.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
◼️ कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
◼️ मध्य महाराष्ट्र : कोल्हापूर, नगर, नाशिक,पुणे, सातारा, सांगली, सोलापूर.
◼️ विदर्भ : अमरावती, भंडारा, बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, गडचिरोली,यवतमाळ, नागपूर,गोंदिया, चंद्रपूर,
◼️ मराठवाडा : बीड, छत्रपती संभाजीनगर,नांदेड, जालना,बुलडाणा, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली.