
डाळिंबाची सोलापूर लाल ही बायोफोर्टीफाइड जात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांनी विकसित केली आहे. त्याबाबत माहिती विस्तृतपणे माहिती पाहूया.
सोलापूर लाल ची वैशिष्ट्ये..
🔰सोलापूर लाल ही जात बायोफोर्टीफाइड जात आहे.
🔰त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जस्त (०.६४-०.६९ मिग्रॅ/१०० ग्रॅ दाणे), अॅन्थोसाइनिन (३८५-३९५ मिग्रॅ/१०० ग्रॅ दाणे) , लोह (५.६-६.१ मिग्रॅ/१००ग्रॅ. दाणे), आणि जीवनसत्तव क (१९.४- १९.८ मिग्रॅ/१००ग्रॅ दाणे), हे गडद लाल, जास्त टीएसएस (१७.५-१७.७ डिग्री बीक्स) इ.
फळ उत्पादकता (२३-२७ टन हे.)
🔰 खाण्यासाठी आणि प्रक्रिया उद्योगासाठी ही जात अत्यंत योग्य आहेत.
🔰 टपोरे दाणे आहेत.
🔰फुल धारणेनंतर सोलापूर लाल ही प्रजाती १६५ दिवसांनी परिपक्व होते.
🔰वेगवेगळ्या वातावरणाच्या आणि हाताळणीच्या पद्धती अंतर्गत याचा कालावधी वेगवेगळा येवू शकतो .
या जातीला बायोफोर्टीफाइड (Biofortified) का म्हटले जाते?
ज्या प्रजातीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने, जीवनसत्त्वे, पोषणद्रव्ये, खनिजे इत्यादी असतात त्यामुळे त्याला बायोफोर्टीफाइड प्रजाती असे म्हणतात. मानवी जीवनातील कुपोषणाची कमतरता भरुन काढण्याचे प्रमुख काम बायोफोर्टीफाइड प्रजाती करतात.
सोलापूर लाल आणि भगवा यातील फरक..
१) सोलापुर लाल ही प्रजाती बायोफोर्टीफाइड प्रजाती आहे. आणि भगवा जातीच्या तुलनेत ही गडद लाल, जास्त टीएसएस, लोह, फळ उत्पादन, जस्त, अॅन्थोसायनीन आणि जीवनसत्व क असलेली त्याबरोबरच टपोरे दाणे, प्रक्रिया उद्योगासाठी व खाण्यासाठी अत्यंत उत्तम आहे.
२) भगवा फुल धारणेनंतर १८० दिवसांनी परिपक्व होतो. ,सोलापूर लाल ही प्रजाती फुल धारणेनंतर १६५ दिवसांनी परिपक्व होते तर म्हणजे सोलापूर लाल ही भगवाच्या तुलनेमध्ये १५ दिवसांनी लवकर पक्व होतो.