बाजारात नवीन मुगाची आवक, भाव किती मिळत आहेत, जाणून घ्या सविस्तर ..

यंदा मान्सून वेळेवर आल्यामूळे खरीप हंगामातील पिकाची पेरणी जून महिन्यामध्ये झाली. त्यानंतर हि पाऊस अधूनमधून समाधानकारक पडला. परंतु , शेंगा भरणीच्या वेळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मूग पिकांचे नुकसान झाले.

त्यामुळे प्रतवारी खालावली तर उताऱ्यात घट निर्माण झाली.बाजारात मुगाची विक्री करण्यासाठी अनेक शेतकरी येत आहेत. मात्र, मुगाला दर क्विंटलला ५ हजारांपासून ते साडेसात हजार रुपयांपर्यंत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ, यांच्या फेऱ्यात शेतकरी भरडला जात आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई नसल्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.

दोन वर्षांपासून कापूस व सोयाबीन पिकाला अपेक्षित भाव मिळत नाही.खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व तूर पिकाच्या उत्पादनावर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अवलंबून असते .

तसेच अनेक शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन पिकाशिवाय पर्याय नाही. मुगाची पेरणीजून महिन्यात पाऊस झाल्यानंतर करण्यात आली.

मुगाला चांगला उतारा यंदा येईल, अशी परिस्थिती होती; परंतु काही भागांत जोरदार पाऊस व वारा असल्यामुळे मुगाला शेंगा चांगल्या भरल्या नाहीत. परिणामी, शेतकरी सांगत आहेत कि मुगाला एकरी जास्तीत जास्त एक क्विंटल उतारा मिळत आहे .

शेतकरी मुगाची विक्री करून पोळ्याच्या सणाची खरेदी करतात. पावसाचा असमोतल काही वर्षांपासून वाढत आहे. त्यामुळे मुगाचे क्षेत्र घडत चालेले आहे
त्यातच हार्वेस्टरने काढलेल्या मुगाची प्रतवारी घसरत असल्यामुळे मुगाला अपेक्षित भाव मिळत नाही: तसेच मुगाची काढणी जर मजुरांच्या साहाय्याने केली, तर मुगाची प्रतवारी चांगली राहत आहे. परंतु , बाजारपेठेत मुगाची आवक होताच भावात घसरण होत आहे.

तालुक्यात ६२,९७९ हेक्टर खरीप क्षेत्र..सेलू तालुक्यामध्ये सोयाबीन २३ हजार ९१७ हेक्टर, तूर ४ हजार ५३७ हेक्टर,कापूस सर्वाधिक ३३ हजार ३३० हेक्टरवर आहे. उडीद २८४ हेक्टर तर मूग ६४० हेक्टर, क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.

८ हजार ६५२ हमीभाव..

मुगाचे खरीप हंगामात अत्यल्प ६४० हेक्टर क्षेत्र आहे. त्यातच उत्पादनामध्ये घट होत असल्याने शेतकरी काळजीत आहे. मुगाला ८,६८२ एवढा हमीभाव शासनाने जाहीर केला आहे; परंतु बाजारपेठेत मुगाच्या प्रतवारीनुसार ५ हजार रुपयांपासून ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.

हमीभावाने खरेदी करण्याची मागणी..

हमीभावाप्रमाणे मुगाची खरेदी होत नसल्याने नाराजी व्यक्त करत आहे मुगाची हमीभावाने खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.अवघ्या काही दिवसांवर पोळा सण येऊन ठेपला आहे. शेतकरी पोळ्याचा बाजार करण्यासाठी मूग विक्रीसाठी घेऊन येत आहेत. ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *