नवीन संसदेच्या उद्धाटन कार्यक्रमाचे टाईमटेबल, होम-हवन, सर्वधर्मीय प्रार्थना आणि मोदींचे भाषण…

New Parliament

सकाळी लोकसभेत साडेआठ ते नऊ वाजता राजदंडांची प्रतिष्ठापणा करण्यात येईल. तमिळनाडूमधील वीस साधू संत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 28 मे रोजी  नव्या संसदेचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.  व त्याची जय्यत तयारी चालू आहे.  केंद्र सरकारचे सर्वात उच्च पदाधिकारी या तयारीला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत.

याचवेळी सूत्रांच्या माहितीवरून उद्घाटनाच्या सर्व कार्यक्रमाची संपूर्ण माहिती समोर आलेली आहे. 28 मे रोजी सकाळी साडेसात ते आठ या वेळेत हवन आणि पूजा होणार आहे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेचे उपसभापती हरीवंश , ओम बिर्ला यांसह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

२८ मे रोजी होणाऱ्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम जाणून घ्या .

या कार्यक्रमात लोकसभा अध्यक्षांच्या बैठक व्यवस्थेजवळ राजदंड लावण्यात येईल . तमिळनाडूमधील बोलवलेले वीस साधू संत या विधीमध्ये सहभागी असतील.सर्वधर्मीय प्रार्थना सभा ही सकाळी नऊ ते साडेनऊ या वेळेत होईल. या सर्वधर्मीय प्रार्थना सभेला पंडित, संत, शंकराचार्यांसह अनेक महान विद्वान, सर्व धर्माचे गुरु , इ . सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान मोदी संबोधिन करणार.

दुपारी बारा वाजता राष्ट्रगीताने दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होईल, याचप्रमाणे दोन लघुपटांचे प्रदर्शन देखील होणार आहे. देशाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या संदेशाचे वाचन राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हे करतील, सभेचे अध्यक्ष देखील यावेळी संबोधन करतील या कार्यक्रमांमध्ये टपाल तिकीट, ऐतिहासिक नाणे काढण्यात येणार आहे . त्यानंतर उपस्थितांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील अडीच वाजता या कार्यक्रमाची सांगता होईल.

उद्घाटन समारंभावर देशातील प्रमुख 19 विरोधी पक्षाने बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.या उद्घाटन समारंभावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकणे चुकीचं आहे. असे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी सांगितले.  वायएसआरसीपीचे प्रमुख आंध्र प्रदेशचे सत्ताधारी राज्याचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी हे या कार्यक्रमाचे उद्घाटनाला उपस्थित राहणार आहे.  

संसदेची कशी असणार आहे नवी इमारत?

– या नवीन इमारतीला सहा प्रवेशद्वार व चार मजले असणार आहेत.

– या मध्ये राज्यसभेचे 400 खासदार तर लोकसभेचे 1000 असे बैठक व्यवस्था आहे.

-सध्या खासदारांना प्रत्येकाच्या समोर टेबल नसून छोटे बाक राहतील.

– या बाकांमध्ये मतदान करण्यासाठी, हजेरी नोंदवण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत.

– यावेतिरिक्त , म्युझियम, 120 कार्यालयं , गॅलरी, या सुविधा देखील असणार आहेत.

– या बाकांमध्ये मतदान करण्यासाठी, हजेरी नोंदवण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *