सध्या भारतीय कांदा हा आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला मागणी होती, त्यामुळे कांद्याची निर्यात वाढली आहे. मात्र याचा दरांवर काय परिणाम होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यंदा कांद्याची निर्यात गेल्यावर्षीपेक्षा ६४ टक्क्यांनी वाढली. तर निर्यातीचे मुल्य केवळ २२ टक्क्यांनी वाढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेली मागणी आणि देशात वाढलेला पुरवठा यामुळे कांदा निर्यात गेल्या सहा वर्षांतील उचांकी पातळीवर पोचली.
यंदा कांदा निर्यातीसाठी स्थिती अनुकूल आहे. पण पावसाने कांद्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले. उत्पादनापैकी जवळपास 30 ते 40 टक्के कांदा हा खराब झाला आहे.
यामुळे कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पण गुणवत्तेचा कांदा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. बांगलादेशने ६ लाख ७० हजार टनांची आयात केली. तर संयुक्त अरब अमिरातीने ४ लाख टन कांदा खेरदी केला.
मलेशियाने जवळपास ४ लाख टन आणि श्रीलंकेने अडीच लाख टनांची खेरदी केली आहे. काही देशांनी भारतीय कांद्याला परवानगी दिली नाही त्यामुळे वाढेल्या मागणीचा भारताला पूर्ण फायदा घेता आला नाही.
source:- krishijagran